शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

CoronaVirus गोव्यात चिकनवर बंदी, 14 तारखेनंतरही सीमा सील राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 9:04 PM

गोव्यात कोरोनाचे केवळ पाचच पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

पणजी : राज्यात चिकनवर बंदी लागू झाली आहे. चिकन खाणो घातक आहे, कारण काही राज्यात बर्ड फ्लूची साथ आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले. येत्या 14 रोजीनंतर लॉक डाऊन कायम ठेवावी की ठेवू नये हे केंद्र सरकार ठरवील पण गोव्याच्या सीमा त्यानंतरही काही दिवस सिल झालेल्या स्थितीत असणो गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

गोव्यात कोरोनाचे केवळ पाचच पॉङिाटीव्ह रुग्ण आहेत. बहुतेक सगळ्य़ा चाचण्यांचे अहवाल नकारात्मक येत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण खूप सापडत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातही सापडत आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमा येत्या दि. 14 नंतरही काही दिवस सिल असणो हे गोव्याच्या हिताचे ठरेल. आम्ही त्याविषयी योग्य तो निर्णय घेणार आहोत. गोमंतकीयांनीही उगाच महाराष्ट्र व कर्नाटकात सध्या जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

राज्यात कुजण्याएवढी भाजीराज्यात भाजी व धान्य साठा आता पुढील पंधरा दिवस पुरेल एवढा आहे. गोव्यात गुरुवारी एकाच दिवशी भाजीचे एकूण 253 ट्रक आले. राज्यात कुजेल एवढय़ा प्रमाणात आता भाजी आहे. गोमंतकीयांनी संयम पाळावा. मासे वगैरे खरेदीसाठी गर्दी करू नये. गोव्यात आता जीवन आरामदायी आहे. लोकांनी उगाच रस्त्यावर येऊ नये. अनेकजण उगाच फिरत असल्याच्या तक्रारी येतात. पोलिस पुन्हा कडक कारवाई सुरू करतील. मग आपल्याला पोलिस मारतात अशी तक्रार कुणी करू नये. ज्यांना डायलसिस करण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव इस्पितळात जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. त्यांना अडविले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या सर्व हेल्पलाईन चालतात हे मी स्वत: तपासून पाहिले. सरकारी वॉट्स अॅपवर 11 हजार 85क् संदेश आले व हेल्प लाईनवर 8355 मॅसेजीस आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या मुख्य तुरुंगाची क्षमता 625 कैदी ठेवण्याएवढी आहे पण 558 एवढेच कैदी तुरुंगात आहेत. ज्या अन्य तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते, त्यांना पेरोलवर सोडले गेले आहे, सर्वाना सोडले नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.गावांमध्ये सव्रेक्षण होणार (चौकट)राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये आरोग्य खाते एनजीओंच्या सहाय्याने मोठय़ा प्रमाणात सव्रेक्षण करणार आहे. गावात कुणाला थंडी, तापाची लागण झालेली आहे काय हे तपासून पाहिले जाईल. जर एखाद्या गावात जास्त संख्येने लोकांना थंडी किंवा ताप दिसून आला तर त्या गावच्या सीमेवर थोडे र्निबध लागू केले जातील. परप्रांतातून तिथे कुणी येऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या