शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गोव्यात तीन दिवसांत 29 कोविडग्रस्तांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:57 IST

आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 315 बळी

पणजी : राज्यात गेल्या तीन दिवसांत म्हणजे रविवार, सोमवार व मंगळवारी एकूण 29 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. डिचोलीतील एका 27 वर्षीय महिलेचाही मयत कोविडग्रस्तांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत कोविडने एकूण 315 रुग्णांचे बळी घेतले आहेत.सोमवारी चौदाजणांचे कोविडने बळी घेतल्यानंतर आरोग्य खात्याची यंत्रणा गडबडली. मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यात आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, सर्व कोविड इस्पितळांचे प्रमुख, आरोग्य केंद्रांचे अधिकारी वगैरे सहभागी झाले. मृत्यूंचे प्रमाण शून्यावर यायला हवे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र लोकांनी ताप वगैरे लक्षणो सात-आठ दिवस अंगावर काढू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. होम आयसोलेशनमध्ये जे कोविडग्रस्त असतात, त्या व्यक्तींच्या आणि कोविड काळजी केंद्रातील रुग्णांच्या संपर्कात आरोग्य अधिका:यांनी रहावे अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.मंगळवारी नऊ कोविडग्रस्तांचा बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात जीव गेला. मडगावच्या ईएसआय इस्पितळात दोघांचे निधन झाले. एक रुग्ण तर गोमेकॉत आल्या आल्याच मरण पावला. मडगाव येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण, पारोडा-सासष्टी येथील 83 वर्षीय रुग्ण, वास्कोतील 82 वर्षीय नागरिक, केपेतील 82 वर्षीय महिला, बागा कळंगुट येथील 34 वर्षीय पुरुष रुग्ण, सांताक्रुझ येथील 52 वर्षीय पुरुष रुग्ण, दाबोळी येथील 55 वर्षीय महिला, खोर्ली म्हापसा येथील 90 वर्षीय पुरुष रुग्ण, पर्वरी येथील 79 वर्षीय पुरुष आणि आमोणा डिचोली येथील 72 वर्षीय महिला रुग्ण यांचे मंगळवारी कोविडमुळे निधन झाले. कोविडमुळे मरणाऱ्यांची संख्या एकदम शून्यावर यावी ही समाजाच्या सर्व घटकांची जबाबदारी आहे. केवळ डॉक्टर किंवा सरकारचीच जबाबदारी नव्हे. कोविडची लक्षणो दिसल्यानंतर लगेच प्रत्येकाने उपचारांसाठी इस्पितळात यायला हवे. मेलेल्या अवस्थेतच कोविडग्रस्तांना इस्पितळात आणले जाते. परवा एक युवक मरण पावला, त्याला लक्षणो दिसताच लगेच इस्पितळात आणणो ही त्याच्या पालकांचीही जबाबदारी होती. वेळेत जर रुग्ण इस्पितळात आला तर त्याच्यावर उपचार करता येतात. आमच्याकडे सगळ्य़ा सुविधा आहेत. आता ऑक्सीजन देखील पुरेसा उपलब्ध आहे.- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या