Goa Election 2022: ना घर का ना घाटका, रेजिनाल्ड लटकले; गोव्यात काँग्रेसची पाचवी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:46 IST2022-01-19T17:45:19+5:302022-01-19T17:46:13+5:30
Goa Election 2022: काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.

Goa Election 2022: ना घर का ना घाटका, रेजिनाल्ड लटकले; गोव्यात काँग्रेसची पाचवी यादी जाहीर
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) सर्वपक्षीय नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरून चांगलीच चुरस रंगलेली दिसते. यातच उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने कुडतरीत मोरेन रिबेलो यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेस पक्षाची उमेदवारीची पाचवी यादी जाहीर झाली आहे. त्यात कुडतरीचे उमेदवार म्हणून मोरेन रिबेलो यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी देण्यापासून रेजिनाल्ड यांचा पत्ता कापला गेला आहे. जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत शिवोली मतदारसंघात मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो, साळगावात केदार नाईक, हळदोणेत कार्लोस आल्वारीस फारिया तर प्रियोळात दिनेश जल्मी यांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत.