शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नितीन गडकरींच्या व्हर्च्युअल मिटींगवर गोव्यात काँग्रेसकडून हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:49 IST

पॅकेजही नाही आणि जीएसटीची भरपाईही नाही; केंद्राकडून गोव्याची बोळवण झाल्याचा आरोप

पणजी : केंद्र सरकारकडून गोव्याची बोळवण चालली आहे. राज्य शासनाने २ हजार कोटींचे पॅकेज मागितले होते ते मिळालेले नाही. जीएसटीची ७५0 कोटी रुपये भरपाईही केंद्राने दिलेली नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जी व्हर्च्युअल मिटींग घेतली त्यावर टिकेची झोड उठवली आहे. चणेकार, खाजेकार तसेच अन्य लहान व्यावसायिकांचे लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचे साधन गेलेले आहे. मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, मासे विकणारे आदी व्यावसायिकही संकटात आहेत. या घटकांचा संयम सुटल्यास उद्या हे लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला. 

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कामत म्हणाले की, ‘लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचे साधन गेलेल्या लहान घटकांना पॅकेजसाठी १00 कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याबाबतही काहीच हालचाली झालेल्या नाहीत. राज्य आज बिकट स्थितीतून जात आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सामान्य माणूस तळमळत आहे. केंद्राने २0 लाख कोटी रुपये पॅकेज जाहीर केले त्यातून गोव्याला काय मिळाले? असा संतप्त सवाल कामत यांनी केला. 

कामत म्हणाले की, ‘पेट्रोल, डिझेलचे दररोज वाढतच चालले आहेत. ६0 ते ७0 पैसे लिटरमागे वाढले आहेत. या महागाईत लोकांचे कंबरडे आणखीनच मोडले आहे. ‘गृहआधार’, ‘लाडली लक्ष्मी’ यासारख्या योजना ठप्प झाल्या आहेत.

माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी म्हादईचा प्रश्न उपस्थित करुन सरकारने म्हादईबाबत आजची स्थिती काय आहे हे जनतेसाठी जाहीर करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले की, ‘कर्नाटकने पाणी वळविल्याने यंदा मे महिन्यात म्हादईच्या पात्रातील पाणी आटले. ही स्थिती कायम राहिल्यास भविष्यात समुद्राचे खारे पाणी थेट सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत पोचेल आणि गोवेकरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही.’ 

राष्ट्रीयकृत बँका संंकटात येतात तेव्हा केंद्राकडून आर्थिक साहाय्य देऊन सावरल्या जातात. मात्र अडचणीत असलेल्या सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र सरकारचे कोणतेही धोरण नाही. महाराष्ट्रातील पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को ऑप बँक वाचविण्यासाठी नीतीन गडकरी केंदीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहितात तर गोव्यातील सहकारी बँका वाचविण्यासाठी हे का होत नाही?, असा प्रश्न खलप यांनी केला. 

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गडकरींचे भाषण म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका केली. गोव्यात आजच्या घडीला ६८३ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असताना गडकरींनी गोव्याचा उल्लेख ग्रीन झोन असा कशावरुन केला? असा सवाल चोडणकर यांनी केला. बेरोजगारी तसेच लॉकडाऊनमुळे लोकांचा पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याबद्दल कोणतेही सोयरसूतक सरकारला नाही.’

आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, ‘पर्यटन व्यावसायिक धास्तावले आहेत. हॉटेलमालकांकडून अर्ज घेतले परंतु अजून परवानगी दिलेली नाही. हॉटेले बंद आहेत तरीही वीज, पाणी बिले मात्र भरावीच लागत आहेत. टुरिस्ट टॅक्सी व्यवसायिक संकटात आहेत. सरकारने या घटकांसाठी काहीतरी करायला हवे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरी