सांगलीच्या भाजपा नगरसेवकांचा जीवाचा गोवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:04 IST2018-08-18T23:03:10+5:302018-08-18T23:04:13+5:30
मॉलमध्ये शॉपिंग; मंदिरांना भेटी, समुद्र किनाऱ्यांवर फेरफटका

सांगलीच्या भाजपा नगरसेवकांचा जीवाचा गोवा!
पणजी : सांगलीच्या महापौर, उपमहापौरांची सोमवारी निवड होणार असून नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून भाजपाच्या ४२ नगरसेवकांना गोव्यात आणण्यात आले आहे. ते जीवाचा गोवा करत आहेत. पर्वरी येथील मॉल दी गोवामध्ये जाऊन शॉपिंगचा त्यांनी आनंद घेतला तसेच मिरामार, दोनापावलच्या समुद्रकिनाºयांना भेटी देण्याबरोबरच मंगेशी येथील प्रसिद्ध मंगेशी मंदिरातही ते गेले होते.
४२ नगरसेवकांमध्ये सांगलीचे भावी महापौर व उपमहापौरही आहेत. काही सहकुटुंब गोव्यात आले आहेत. गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे, तेथे गोव्यातील भाजपा पदाधिकाºयांचीही नजर आहे. महाराष्ट्रातून येऊन त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणूनही काळजी घेतली जात आहे. सर्व नगरसेवक एकाच बसमधून कुटुंबासह फिरत आहेत. एकट्या नगरसेवकाला कुठे सोडले जात नाही. शुक्रवारी या नगरसेवकांनी पणजी-म्हापसा महामार्गावर असलेल्या मॉल दी गोवा या प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन खरेदी केली. मंदिरे, मॉल, चर्चेस आणि सागरकिनारे याव्यतिरिक्त दूर कुठे जाऊ नका, असा संदेश गोव्यातील भाजपा नेत्यांनी नगरसेवकांना दिलेला आहे. त्यांचा निवास असलेल्या हॉटेलचे नाव गुप्त ठेवले आहे. रविवारी हे नगरसेवक गोव्याचा निरोप घेतील. गोव्यात कपडे, भेटवस्तू व कुटुंबीयांसाठी त्यांनी खरेदी केली.