देशात पाचव्या क्रमांकावर येणे ही अभिमानास्पद बाब: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:30 IST2025-12-08T14:27:43+5:302025-12-08T14:30:20+5:30
डिचोली पोलिस स्थानक हे आपल्याच डिचोली तालुक्यात येत असल्याने त्यांनी पटकावलेला हा मान हा आपणासाठीही अभिमानास्पद आहे.

देशात पाचव्या क्रमांकावर येणे ही अभिमानास्पद बाब: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : केंद्रीय गृहकल्याण मंत्रालयातर्फे देशभरातून हाती घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात डिचोली पोलिस स्थानक हे देशपातळीवर पाचव्या क्रमांकावर येणे ही आपणासाठी व गोव्यासाठीही मोठ्या अभिमानाची बाब आहे.
डिचोली पोलिस स्थानकाचे कार्य उल्लेखनीय असून, शोधकार्याचा दर हा ९० टक्क्यांवर राखण्यात यश मिळविले आहे. अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात जागृती करण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
पोलिस स्थानकाचा देशपातळीवर पाचवा क्रमांक आल्याने मुख्यमंत्र्यांनी डिचोली पोलिस स्थानक, तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांचे अभिनंदन केले.
डिचोली पोलिस स्थानक हे आपल्याच डिचोली तालुक्यात येत असल्याने त्यांनी पटकावलेला हा मान हा आपणासाठीही अभिमानास्पद आहे. अशा प्रकारचे कार्य गोव्यातील सर्व पोलिस स्थानकांमधून झाल्यास गोवा राज्य कायदा सुव्यवस्था, तसेच गुन्हेगारी रोखण्यात देशात अव्वल ठरणार, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.