F4 रेसिंगचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा; मोपा येथील विमानतळ परिसरात चॅम्पियनशीपचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:34 IST2026-02-13T10:33:46+5:302026-02-13T10:34:43+5:30

आमदार प्रवीण आर्लेकर यांची उपस्थिती

cm pramod sawant reviews f4 racing championship thrills at Mopa airport area | F4 रेसिंगचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा; मोपा येथील विमानतळ परिसरात चॅम्पियनशीपचा थरार

F4 रेसिंगचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा; मोपा येथील विमानतळ परिसरात चॅम्पियनशीपचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि. १४ व १५ रोजी होणाऱ्या एफ फोर इंडियन चॅम्पियनशिप रेसिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१२) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह परिसराची पाहणी करून या स्पर्धेच्या तयारी विषयी माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या इव्हेंटमुळे देश-विदेशातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करून अशा स्पर्धात्मक इव्हेंटला सरकार सदोदित पाठिंबा देत असल्याचे सांगितले. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी फोर इंडियन चॅम्पियनशिप रेसिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सरकारचा यास इव्हेंटला पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आपणही त्याला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.

पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळ परिसरात प्रथमच द इंडियन रेसिंग फेस्टिवल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रेसिंग स्पर्धेसाठी देशातील दिग्गज स्पर्धक सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी सरकारने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. सुरुवातीला काही नागरिक आणि काही सामाजिक संस्थांनी विरोध दर्शवला होता. परंतु सरकार आयोजनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

इंडियन रेसिंग फेस्टिव्हल हा इव्हेंट पहिल्यांदाच मोपा विमानतळावर होत आहे. या उपक्रमांतर्गत गोव्याला उच्च ऑक्टिन फॉर्मुला स्ट्रीट रेस वीकेंडसाठी एक प्रमुख मोटर्स स्पोर्ट रुपांतरीत केले जात आहे. १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेमुळे फेस्टिव्हलच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सद्वारे टीव्ही चॅनलवर प्रक्षेपित केले जाणार असल्याने नागरिकांना घरबसल्या ही स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे.

विमानतळाच्या विस्तीर्ण परिसरात तयार करण्यात आलेल्या बारा वळणाच्या या ट्रॅकची रचना जवळच्या लढती उशिरा ब्रेकिंग आणि सातत्याने स्थान बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली आहे. इंडियन रेसिंग लीगची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तिची समावेशक संघरचना प्रत्येक संघात चार चालक असणार, एक अनुभवी आंतरराष्ट्रीय चालक एक उदयोन्मुख जागतिक प्रतिभा एक भारतीय चालक आणि एक महिला चालक अशी रचना असणार आहे.

स्पर्धेचे स्वागत : आरोलकर

याबाबत आमदार जीत आरोलकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, हा इव्हेंट एक स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्राला वाव देण्याबरोबरच वेगवेगळ्या देशातील पर्यटक या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी येतील. दिग्गज स्पर्धक सहभागी होणार आहे. सरकारचा या रेसिंगसाठी पूर्ण पाठिंबा असल्याने आपणही या स्पर्धेचं स्वागत करतो.

संघमालक क्रीडा, चित्रपटसृष्टीतील

या वीकेंडला आणखी आकर्षण ठरणार आहे क्रीडा आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत संघमालकांची उपस्थिती असणार असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. गोवा एसएसजी रेसिंगचे नेतृत्व जॉन अब्राहिम करत आहेत. तर स्पीड डेमस दिल्ली संघाला अर्जुन कपूर पाठिंबा देत आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज सौरव गांगुली कोलकत्ता रॉयल टायगरची प्रमुख असून नागा चैतन्य हैदराबाद ब्लॅक बईस चा मालक आहे.

 

Web Title : मुख्यमंत्री ने F4 रेसिंग की समीक्षा की; मोपा हवाई अड्डे पर रोमांच

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने मोपा हवाई अड्डे पर F4 इंडियन चैंपियनशिप की तैयारियों की समीक्षा की। इस आयोजन से पर्यटन को बढ़ावा मिलने की उम्मीद है। सरकार ऐसे आयोजनों का समर्थन करती है। रेस का प्रसारण स्टार स्पोर्ट्स पर किया जाएगा। खेल और फिल्म जगत की हस्तियां टीमों के मालिक के रूप में भाग लेंगी।

Web Title : CM Reviews F4 Racing; Championship Thrills at Mopa Airport

Web Summary : CM Pramod Sawant reviewed F4 Indian Championship preparations at Mopa airport. The event is expected to boost tourism. The government supports such events. The race will be broadcast on Star Sports. Sports and film personalities will attend, owning teams.