मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

By किशोर कुबल | Updated: April 6, 2025 12:50 IST2025-04-06T12:48:27+5:302025-04-06T12:50:09+5:30

मुख्यमंत्री सावंत हे भाजपमध्ये त्यांची परंपरा चालवत आहेत.

cm pramod sawant family the Journey from jan sangh to bjp | मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुटुंब रा. स्व. संघाच्या विचारांचे आहे. त्यांचे वडील पांडुरंग हे जिल्हा पंचायत सदस्य होते. तेव्हाचा जनसंघ, विहिंप तसेच भारतीय मजदूर संघातही त्यांनी काम केले आहे. मुख्यमंत्री सावंत हे भाजपमध्ये त्यांची परंपरा चालवत आहेत.

१९८० साली भाजपची स्थापना झाली. त्यानंतर काशिनाथ परब हे प्रदेश भाजपचे पहिले अध्यक्ष बनले. विश्वनाथ आर्लेकर, माधव धोंड वगैरे त्यावेळी सक्रिय होते. १९८४ साली भाजपने गोव्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. परंतु यश आले नाही. त्यानंतर श्रीपाद नाईक वगैरे भाजपात आले. १९८९ साली पक्षाने दुसऱ्यांदा निवडणूक लढवली.

डॉ. प्रमोद सावंत हे राजकारणात आले ते दिवंगत मनोहर पर्रीकरांमुळेच! सुमारे तीन दशके पर्रीकर यांचे गोवाभाजपावर एकहाती वर्चस्व होते. त्यांनी माणसे निवडली, मोठी केली. सावंत कुटुंबीय संघाशी संबंधित असल्याने पर्रीकर त्यांच्या घरी येत असत. प्रमोद सावंत हे तेव्हापासूनच त्यांच्या नजरेत होते. पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्याअगोदर सावंत वैद्यकीय प्रॅक्टिससुद्धा करत होते. ते संघाच्या आणि त्यांच्या भागातल्या इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कार्यरत असायचे. भाजपामध्ये त्यांना तरुण वयात जबाबदाऱ्या मिळत गेल्या. ते गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनेक काळ होते. त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही करण्यात आलेले. २००८ साली साखळी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होती, ती त्यांनी लढवली. या निवडणुकीत ते हरले; पण त्यांचं राजकारणातले करियर मात्र सुरू झाले.

आर्लेकरांचे भाजपशी नाते...

गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर, जे सध्या केरळचे राज्यपाल आहेत. ते अशा कुटुंबातून आले आहेत, जे जनसंघाच्या काळापासून भाजपशी जवळून जोडलेले आहेत. आर्लेकर यांचे वडील स्वर्गीय विश्वनाथ हे दादा म्हणून ओळखले जात होते. वास्को आणि मुरगाव तालुक्यांत भाजपची पाळेमुळे मजबूत करण्यात आर्लेकर कुटुंबांचा मोठा वाटा आहे. आर्लेकर यांना त्यांच्या वडिलांकडून कडक शिस्तीचे धडे मिळाले. आर्लेकर खूप लहान वयातच संघाकडे आकर्षित झाले. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी यांनी सुरू केलेल्या अयोध्या राम मंदिर चळवळीच्या दरम्यान राम रथयात्रेसह अनेक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आर्लेकर हे त्यांच्या वडिलांना आणि इतर कट्टर जनसंघ सदस्यांना मदत करायचे.

भाजपचे आतापर्यंतचे प्रदेशाध्यक्ष

काशिनाथ परब : १९८० ते १९८९ : २ वर्षे
विश्वनाथ आर्लेकर : १९८९ ते १९९१ : २ वर्षे
श्रीपाद नाईक : १९९१ ते १९९५ : ४ वर्षे
सुरेश आमोणकर : १९९५ ते २००० : ५ वर्षे
लक्ष्मीकांत पार्सेकर : २००० ते २००३ : ३ वर्षे
राजेंद्र आर्लेकर : २००३ ते २००७ : ४ वर्षे
श्रीपाद नाईक : २००७ ते २०१० : ३ वर्षे
लक्ष्मीकांत पार्सेकर: २०१० ते २०१२ : २ वर्षे
विनय तेंडुलकर : २०१२ ते २०२० : ८ वर्षे
सदानंद शेट तानावडे : २०२० ते २०२५ : ५ वर्षे
दामू नाईक : १८ जानेवारी २०२५ पासून (विद्यमान)

 

Web Title: cm pramod sawant family the Journey from jan sangh to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.