हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 11:59 IST2024-10-09T11:57:19+5:302024-10-09T11:59:09+5:30

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ही पावती असल्याचे म्हटले आहे.

cm pramod sawant and bjp state president members celebrate haryana assembly election 2024 victory | हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याने या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सेवा, सुशासन व गरीब कल्याणाचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.

सावंत म्हणाले की, अंत्योदय तत्त्वाचे ध्येय ठेवून सबका साथ, सबका विकासाचाही हा विजय आहे. या यशाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना कार्यकर्ते हेच पक्षाचा कणा असल्याचे म्हटले आहे. पंतपप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हरयानाचा मुख्यमंत्री नायब सैनी व तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बादोली यांचे विजयात मोठे श्रेय असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ही पावती असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title: cm pramod sawant and bjp state president members celebrate haryana assembly election 2024 victory