शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या प्रश्नपत्रिकेला आता 'बारकोड'; प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हायरल केल्यास तत्काळ सापडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:26 IST

प्रश्नपत्रिकेचा कुणी फोटो वगैरे काढून तो व्हायरल केल्यास तत्काळ संबंधित पकडला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात कालपासून इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिकेचा यंदापासून बारकोडची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा कुणी फोटो वगैरे काढून तो व्हायरल केल्यास, तत्काळ संबंधित पकडला जाणार आहे.

सध्या सुरू असलेली परीक्षा यंदा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी गोवा शालान्त मंडळाने एक महत्त्वाचा बदल केला आहे. परीक्षेच्या दरम्यान किंवा नंतर प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित होण्याच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी मंडळाने यंदा प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर 'बारकोड'ची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विशेष म्हणजे, हा बारकोड प्रश्नपत्रिकेच्या केवळ पहिल्या पानावर नसून प्रत्येक पानावर छापण्यात आला आहे.

या नव्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक प्रश्नपत्रिकेची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. जर चुकूनही एखादी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली, तर तो विशिष्ट संच कोणत्या विद्यार्थ्याला मिळाला होता, याची माहिती मंडळाला तत्काळ मिळणार आहे. या उपक्रमाचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भीती घालणे हा नसून, परीक्षेची गोपनीयता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे हा आहे.

केंद्रीय संस्थांच्या धर्तीवर पाऊल

देशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासारख्या मोठ्या संस्थांनीदेखील अशा प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांचा यशस्वी वापर केला आहे, त्याच धर्तीवर आता गोवा बोर्डानेही हे पाऊल उचलले आहे. यामुळे बारावीच्या परीक्षेबरोबरच बारावीच्या प्रश्नपत्रिकेलाही विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

परीक्षेत शिस्त आणि सुरक्षितता राहावी यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असून, आपली प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवणे ही आता विद्यार्थ्यांचीही नैतिक जबाबदारी बनली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना शालान्त मंडळाने केल्या आहेत. - भगिरथ शेट्ये, अध्यक्ष, गोवा शालान्त मंडळ

 

English
हिंदी सारांश
Web Title : 12th Grade Question Papers Now Barcoded; Instant Detection of Viral Photos

Web Summary : Goa Board introduces barcodes on 12th-grade question papers for enhanced security. Viral photos will lead to immediate identification of the student. This measure aims to maintain exam integrity and confidentiality, similar to central boards' practices.
टॅग्स :goaगोवाHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र