शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मुख्यमंत्री सोमवारी घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 6:34 PM

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी करंजाळे- दोनापावल येथील आपल्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी करंजाळे- दोनापावल येथील आपल्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दोनवेळा सचिवालयात मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या, पण आता त्यांनी सचिवालयात येणो पुन्हा थांबविले आहे. त्यामुळे ते घरीच सर्व मंत्र्यांना भेटतील.पर्रीकर हे दिल्लीतील एम्समधून उपचार घेऊन परतल्यानंतर पुन्हा मंत्रालय तथा सचिवालयात गेले नाहीत. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा त्यांनी सचिवालयाला भेट देण्याचा योग आला नाही. पर्रीकर सध्या घरीच असतात. ते घराकडूनच काम करतात. पर्रीकर यांनी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली तरी, बैठकीसमोर कोणती कार्यक्रम पत्रिका असेल याची कल्पना अजून कुठच्याच मंत्र्याला आलेली नाही. सोमवारी सकाळीच आम्हाला अजेंडा मिळेल, असे काही मंत्र्यांनी लोकमतला सांगितले.दरम्यान, अधिवेशन पार पडल्यानंतरची ही पहिली बैठक आहे. नोकर भरतीची प्रक्रिया सरकारने आताच सुरू केली असून अजुनही काही अडचणी भरतीवेळी येत आहेत काय हे मुख्यमंत्री मंत्र्यांकडून जाणून घेतील असे कळते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 2 मार्चनंतर कधीही लागू शकते. एकदा आचारसंहिता लागू होताच नोकर भरती स्थगित होईल. राज्यातील खनिज खाण बंदीविषयी उपाय निघेल असे सर्व मंत्र्यांना यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. अजून तोडगा निघाला नाही, तोडगा निघण्याची शक्यताही अनेक मंत्री, आमदारांना दिसत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्री याविषयी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वीजमंत्री निलेश काब्राल हे सध्या जाहीरपणो अनेक विधाने करत आहेत. त्याचेही पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा