शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आदर्शवत... मुख्यमंत्री करणार मूत्रपिंड, यकृत व बुबूळ दान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 05:56 IST

ऑनलाईन नोंदणी करून मिळवले प्रमाणपत्र

लाेकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अवयवदानाची शपथ घेतली असून मरणोत्तर ते आपले मूत्रपिंड, यकृत व डोळ्यातील बुबूळ ( कोर्निया) दान करणार आहेत. गुरुवारी त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अवयवदान करत असल्याची माहिती दिली. प्रदेश भाजपच्या वैद्यकीय विभागाने काल हा अवयवदान नोंदणीचा कार्यक्रम घडवून आणला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, सहप्रमुख स्नेहा भागवत व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते. भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्ताने देशभर अवयव दानाबद्दलही जागृती केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी अवयदानाची शपथ घेऊन प्रमाणपत्रही मिळवले आहे. आतापर्यंत गोमेकॉत अवयव दानाची चार प्रकरणे यशस्वी झालेली आहेत. सर्वांनी आपणहून पुढे येऊन अवयवदान करायला हवे. त्यासाठी फक्त अठरा वर्षे वयाच्या वर व्यक्ती हवी. आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघांमध्ये तसेच प्रत्येक तालुक्यात अवयवदानाविषयी जागृती घडवून आणावी.

     मूत्रपिंडाचे आजार एवढे वाढले आहेत की, गोव्यात दिवसाला एक तरी नवीन व्यक्ती डायलिसीससाठी पाठवावी लागते. डॉ. शेखर साळकर म्हणाले की, ब्रेन डेड व्यक्तीही पाच जणांना वेगवेगळ्या अवयव दानाने जीवदान देऊ शकते. संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले तरी संबंधित व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांनीही संबंधिताच्या अवयव दानासाठी परवानगी द्यावी लागते व त्यानंतरच हे सोपस्कार पूर्ण होतात, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

मूत्रपिंड प्रत्यारोपण ‘दीनदयाळ’मध्ये आणणार

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसवाय) कार्डाच्या कक्षेत आणणार आहे.

गोमेकॉत पूर्ववत नेत्रपेढी सुरू केली जाईल. तसेच हृदय आणि यकृत रोपणाच्या शस्त्रक्रियेची सोयही केली जाईल. राज्यात ४६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रत्येकाने अवयवदान केल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अवयवदान घोषणेनंतर... मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेताना अवयवदानाची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच जेव्हा जुने समज गैरसमज वगैरे दूर सारून  अशा भल्या कामांसाठी पुढे सरसावतात तेव्हा त्यांचे अनुकरण करण्यास इतर लोकही पुढे येतात. निदान भाजपचे कार्यकर्ते तरी निश्चितच पुढे येतील याबद्दल शंका नसावी. परंतु हे करतानाच एक महत्त्वाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर सोपविली आहे.   अवयव दान करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कारण माणसाच्या मृत्युपर्यंत  त्याचे अवयव चांगले निरोगी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री स्वत: एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना याविषयी पुरेपूर माहिती आहे. परंतु आता कार्यकर्त्यांवर जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.  त्यासाठी चांगल्या संवयी लावणे, व्यसनांपासून दूर राहणे  या गोष्टी पाळाव्या लागतील. त्यामुळे त्यांना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो इतकेच आपण म्हणू.

टॅग्स :goaगोवाChief Ministerमुख्यमंत्रीOrgan donationअवयव दान