'साखळी' जिंकली ! मुख्यमंत्री सावंत यांचे निर्विवाद वर्चस्व, फोंड्यात रवी नाईक यांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:17 PM2023-05-08T15:17:47+5:302023-05-08T15:19:16+5:30

राज्यातील साखळी व फोंडा या दोन्ही पालिकांवर भाजपने झेंडा फडकावला आहे.

chief minister pramod sawant undisputed supremacy in sakhali and ravi naik won in ponda | 'साखळी' जिंकली ! मुख्यमंत्री सावंत यांचे निर्विवाद वर्चस्व, फोंड्यात रवी नाईक यांनी मारली बाजी

'साखळी' जिंकली ! मुख्यमंत्री सावंत यांचे निर्विवाद वर्चस्व, फोंड्यात रवी नाईक यांनी मारली बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः राज्यातील साखळी व फोंडा या दोन्ही पालिकांवर भाजपने झेंडा फडकावला आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. साखळीत मुख्यमंत्र्यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून १२ पैकी ११ प्रभागांमध्ये भाजप विजयी झाला आहे. तर फोंडा पालिकेत १३ पैकी ८ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

निवडणुका पक्षाविरहित असल्या तरी भाजपसह सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली होती. साखळीत सावंत यांची तर फोंड्यात कृषीमंत्री रवी नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले.

साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या, खुद 'टुगेदर फॉर साखळी या विरोधी पॅनलचे नेते धर्मेश सगलानी यांचा ३० मतांनी पराभव झाला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत सगलानी हे मुख्यमंत्री सावंत यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ठरले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना केल ६६६ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. दुपारी राज्य निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. साखळी पालिकेत ८७.५६ टक्के विक्रमी मतदान झाले होते. तर फोंडा पालिकेत ७४.६६ टक्के मतदान झाले होते. साखळीतील प्रभाग ८ मध्ये रियाझ खान व प्रभाग ५ मध्ये प्रवीण ब्लेगन तर फोंड्यात प्रभाग ७ मध्ये भाजपचे विश्वनाथ दळवी व प्रभाग १३ मध्ये विद्या पुनाळेकर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

लोकांनी विश्वास दाखवला : तानावडे

या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी 'लोकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवला' असे म्हटले आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकारचे जे काम चालले आहे, त्याची लोकांनी पावती दिली. साखळीत १२ पैकी ११ जागा भाजपला मिळाल्या हे मोठे यश आहे. फोंड्यातही मंत्री रवी नाईक यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवला. येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच जिंकणार याचे हे संकेत आहेत,' असे ते म्हणाले.
 

Web Title: chief minister pramod sawant undisputed supremacy in sakhali and ravi naik won in ponda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.