शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

गोव्यात खाण धंदा सुरू करण्यास तूर्त खनिज मालक निरुत्साही : मुख्यमंत्री पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 10:55 AM

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढलेले नाहीत. ते खूप कमीच आहेत. यामुळे गोव्यातील खनिज व्यावसायिक सध्या तरी नव्याने खाणी सुरू करण्याबाबत निरूत्साही आहेत, असे निरीक्षण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नोंदवले आहे.

पणजी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढलेले नाहीत. ते खूप कमीच आहेत. यामुळे गोव्यातील खनिज व्यावसायिक सध्या तरी नव्याने खाणी सुरू करण्याबाबत निरूत्साही आहेत, असे निरीक्षण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नोंदवले आहे.

एरवी पावसाळा संपला की आॅक्टोबरमध्ये खनिज खाणी नव्याने सुरू होत असतात. गोव्यात अजून खाण धंदा नव्याने सुरू झालेला नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की खनिज व्यवसायिक तूर्त नवे खनिज उत्पादन घेण्यास उत्सुक नाहीत. ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाला किंमत वाढावी म्हणून थांबले आहेत. काहीजण पूर्वीच्या मालाची थोडी निर्यात करत आहेत. जास्त नफा मिळत नसला तरी ते निर्यात करत आहेत, कारण त्यांना माल खरेदीदाराशी असलेले नाते टिकवून ठेवायचे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यात सध्या 80 खनिज खाणी आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष किती खाणी सुरू झाल्या याची सरकारला कल्पना नाही. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने थोड्या खाणींना मान्यतेचे दाखले दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की गोव्याचा खनिज माल हा कमी प्रतीचा आहे.  शिवाय आता न्यायालयाने वार्षिक वीस दशलक्ष टन एवढी वार्षिक उत्पादन मर्यादा ठरवून दिलेली असल्याने पूर्वीसारखी आता जास्त निर्यात होऊ शकत नाही. 2009 सालापासून सलग तीन वर्षे गोव्यात खाण व्यवसाय अचानक खूप वाढला होता. त्यावेळी 54 दशलक्ष टनापर्यंत खनिज निर्यातीचे प्रमाण पोहचले होते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दरही खूप वाढले होते. आता स्थिती नेमकी वेगळी आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की 2009 पासून गोव्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक खरेदी केले. त्यासाठी झारखंड, बिहार आदी ठिकाणाहून चालक आणले. खाण बंदी लागू होताच हे सगळे अडचणीत आले. तरी देखील गोवा सरकारने सहा हजार ट्रक मालकाना कर्जमुक्त केले आहे. 

दरम्यान गोवा राज्य आता महसुल प्रापतीबाबत खनिज खाण व्यवसायावर अवलंबून नाही असे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. गोव्याला पूर्वी वार्षिक एक हजार कोटींचा महसुल खनिज खाण धंद्यातून मिळत होता. आता फक्त तीनशे कोटींचा महसुल प्राप्त होतो. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा