गोवा राजभवनविरुद्धच्या तक्रारीवर मुख्य माहिती आयुक्तांचा उद्या निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 13:15 IST2018-10-14T13:15:41+5:302018-10-14T13:15:50+5:30

गोव्यात राजभवनकडून माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीवर उद्या १५ आॅक्टोबर रोजी सकाळी १0.३0 वाजता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त प्रशांत तेंडुलकर निवाडा देणार आहेत.

Chief Information Commissioner tomorrow's judgment on complaint against Goa Raj Bhavan | गोवा राजभवनविरुद्धच्या तक्रारीवर मुख्य माहिती आयुक्तांचा उद्या निवाडा

गोवा राजभवनविरुद्धच्या तक्रारीवर मुख्य माहिती आयुक्तांचा उद्या निवाडा

पणजी - गोव्यात राजभवनकडून माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीवर उद्या १५ आॅक्टोबर रोजी सकाळी १0.३0 वाजता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त प्रशांत तेंडुलकर निवाडा देणार आहेत. गोव्याच्या राजभवन कडून आरटीआय कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मुख्य माहिती आयुक्तांच्या समोर सादर केली होती. या याचिकेवर अंतिम सुनावणी पूर्ण झालेली आहे. 

आयरिश यांचा असा दावा आहे की, ‘आरटीआय कायद्याच्या कलम २ (एच)अन्वये राजभवन ‘सार्वजनिक अधिकारिणी’ असूनही अद्याप तेथे सार्वजनिक माहिती अधिकारी नेमण्यात आलेला नाही. ही नियुक्ती न करणे कायद्याला धरुन नाही. तर दुसरीकडे राजभवन माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा राजभवनचा दावा आहे. 

देशभरातील सर्व राजभवनांमध्ये तसेच राष्ट्रपती भवनातही आरटीआय कायद्याची अंमलबजावणी केली जाते. व्यवहार पारदर्शक रहावेत यासाठी बळकटी देणारा हा कायदा गोव्याच्या राजभवनकडूनच कमकुवत बनविला जात आहे, असा आरोपही आयरिश यांनी केला आहे.

Web Title: Chief Information Commissioner tomorrow's judgment on complaint against Goa Raj Bhavan

टॅग्स :goaगोवा