शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून जनगणना; दोन टप्प्यांत होणार काम, ३,०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:19 IST

या प्रक्रियेसाठी १६ भाषांमध्ये उपलब्ध असलेले विशेष मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशाच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना आज बुधवार, १ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून, राज्यात त्याअंतर्गत आजपासून 'स्व-गणना' हा टप्पा राबवला जाईल, अशी माहिती आयएएस अधिकारी चेष्टा यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१ एप्रिल ते १५ एप्रिलदरम्यान स्व-गणनेचा पहिला टप्पा राबवला जाईल, तर दुसरा टप्पा हा देशपातळीवरील जनगणनेचा आहे. तो ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या काळात राबवला जाईल. जनगणनेच्या कामासाठी एकूण ३ हजार ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात ४२२ शिक्षक व २ हजार ४६७सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएएस अधिकारी यादव म्हणाल्या, 'आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनगणनेची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यात आली आहे. स्व-गणना या टप्प्यांअंतर्गत नागरिक स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील. त्यांना ३३ प्रश्नांची यादी दिली जाईल. १६ एप्रिल ते १५ मे २०२६ दरम्यान 'घर सूचीकरण' आणि 'गृहगणना' हा पहिला टप्पा पूर्ण होईल.

१६ भाषांमध्ये अॅप

या प्रक्रियेसाठी १६ भाषांमध्ये उपलब्ध असलेले विशेष मोबाइल अॅप विकसित करण्यात आला असून, त्यात कोंकणी भाषेचाही समावेश आहे. माहितीची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. त्यासाठी नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन यादव यांनी केले.

गणनेचा दुसरा टप्पा

दुसरा टप्पा म्हणजे 'लोकसंख्या गणने'चा असेल. हा ९ ते २८ फेब्रुवारी २०२७दरम्यान होणार आहे. या जनगणनेची अंतिम आकडेवारी १ मार्च २०२७ रोजी जाहीर केली जाईल. ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार असून, देशाच्या विकास धोरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तिन्ही जिल्ह्यात ५० फिल्ड सर्व्हेक्षक

राज्यात उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती अशा तीन जिल्ह्यांमध्ये विभागून जनगणना प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी ५० फिल्ड सर्व्हेक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी जनगणनेचे काम करतील. तिन्ही जिल्ह्यांचे संबंधित जिल्हाधिकारी हे जनगणना अधिकारी म्हणून काम पाहतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Begins Digital Census Today in Two Phases with 3,086 Staff

Web Summary : Goa starts its digital census today in two phases. The first phase, 'Self-Enumeration,' runs from April 1-15. 3,086 staff, including teachers and government employees, are appointed. A mobile app in 16 languages, including Konkani, facilitates data collection. The final census data will be released on March 1, 2027.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार