कोळसा जेटी रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:50 IST2026-02-24T13:47:44+5:302026-02-24T13:50:10+5:30

कुडचडेवासीयांचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर धरणे

cancel the coal jetty otherwise we will intensify the agitation | कोळसा जेटी रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू

कोळसा जेटी रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कुडचडे मतदारसंघातील असोल्डा, शेळवण, होडार येथील ग्रामस्थांनी तसेच परिसरातील लोकांनी सोमवारी पणजी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर एकत्र येत धरणे आंदोलन केले. कोळसा जेटी प्रकल्प त्वरित रद्द करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. आठ दिवसांच्या आत हा प्रकल्प रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला. यावेळी आमदार नीलेश काब्राल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सामाजिक कार्यकर्ते रोहन देसाई व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, प्रदूषण आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होणारा धोका याबाबत चिंता व्यक्त केली. कोळसा हाताळणीमुळे हवा आणि पाण्याचे प्रदूषण वाढेल, तसेच शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांनी घोषणा देत सरकारने लोकांच्या भावना लक्षात घेऊन कोळसा जेटी प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. स्थानिकांच्या मते हा प्रकल्प पर्यावरणीय समतोलाला धक्का देणारा आहे. विकासाच्या नावाखाली तडजोड करता येणार नाही.

सरकारने भूमिका स्पष्ट करावी : होडारकर

कुडचडे नगरपरिषदेचे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी सांगितले की, हे आंदोलन चार-पाच दिवस आधी जाहीर करण्यात आले होते, तरीही सरकारने आमच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्हाला सरकारने हा प्रकल्प तत्काळ थांबवावा अशी अपेक्षा आहे. हा प्रश्न फक्त शेळवण गावापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण परिसराशी संबंधित आहे. या प्रकल्पाचा परिणाम सर्वांवर होणार असून पुढची पिढी आम्हाला शाप देईल. त्यामुळे सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.

सरकारने गोवा संपवला : पाटकर

अमित पाटकर म्हणाले, सध्या गोवा या भाजप सरकारने संपविला आहे म्हणून राज्यभर सरकार विरोधात आंदोलने सुरू आहेत. कुडचडेमध्येही प्रस्तावित जेटी प्रकल्पामुळे स्थानिकांच्या पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असून ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तत्काळ थांबवावा. कोळसा हाताळणीसाठी जेटी उभारण्याचे काम सुरू असताना सरकारकडून कोणतीही स्पष्ट भूमिका समोर येत नाही. त्यामुळे उद्योजक दिनार तारकर यांना कोणत्या आमदार किंवा मंत्र्याचे संरक्षण आहे, नेमके कोण या प्रकल्पामागे उभे आहे आणि कोणाचे राजकीय संरक्षण मिळत आहे, याबाबत जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत.

असोल्ड्यातील जेटीला आमदार काब्राल यांचाही विरोध

असोल्डा येथील प्रस्तावित कोळसा हाताळणी जेट्टी प्रकल्पाला आमदार नीलेश काब्राल यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. काब्राल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. काब्राल यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा अहवाल चुकीचा असून स्थानिक पंचायतीनेही त्यावर आक्षेप घेतले आहेत तसेच प्रकल्पासाठी योग्य प्रवेश मार्ग नसल्यामुळे हा प्रकल्प व्यवहार्य नाही, असे त्यांनी नमूद केले. पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करून या प्रकल्पाची सखोल छाननी करून तो रद्द करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title : कोयला जेटी रद्द करो, अन्यथा आंदोलन तेज होगा: ग्रामीणों की चेतावनी

Web Summary : गोवा के कुर्चडे में ग्रामीणों ने कोयला जेटी परियोजना का विरोध किया, पर्यावरण और स्वास्थ्य संबंधी चिंताएं जताईं। उन्होंने आठ दिनों के भीतर इसे रद्द करने की मांग की और आंदोलन तेज करने की धमकी दी। विधायक नीलेश काब्राल सहित राजनेताओं ने प्रदूषण और पारिस्थितिक क्षति की संभावना को उजागर करते हुए विरोध का समर्थन किया। सरकार से जवाब देने का आग्रह किया गया है।

Web Title : Cancel Coal Jetty; Otherwise, Intensify the Agitation, Warn Villagers

Web Summary : Villagers protest coal jetty project in Kurchade, Goa, citing environmental and health concerns. They demand its cancellation within eight days, threatening intensified agitation. Politicians, including MLA Nilesh Cabral, support the protest, highlighting potential pollution and ecological damage. The government is urged to respond.