गोवा : आरोग्य खात्याकडून डीडीएसएसवाय कार्ड नुतनीकरणासाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:48 PM2024-03-04T16:48:49+5:302024-03-04T16:49:29+5:30

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षासाठी आजपासून नुतनीकरण

Call for DDSSY Card Renewal from Health Department goa health | गोवा : आरोग्य खात्याकडून डीडीएसएसवाय कार्ड नुतनीकरणासाठी आवाहन

गोवा : आरोग्य खात्याकडून डीडीएसएसवाय कार्ड नुतनीकरणासाठी आवाहन

नारायण गावस 

पणजी: गोवा सरकारच्या आराेग्य खात्यामार्फत राबविण्यात येणारी दिन दयाळ स्वास्थ सेवा योजना अंतर्गतच्या कार्डचे नुतनीकरणाचे काम आज ४ मार्च पासून सुरु झाले आहे. पुढील १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षासाठी डीडीएसएसवाय याेजना कार्ड नुतनीकरण करण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. ऑनलाईन नूतनीकरण www.goaonline.gov.in या संकेस्थळावर करु शकतात. १ एप्रिल २०२४ पासून नूतनिकरण केलेले कार्ड संलग्न रुग्णालयांमधून सेवा घेण्यासाठी अनिवार्य असणार आहे असेही आरोग्य खात्याने नमूद केले आहे.

गोवा सरकार सार्वजनिक आरोग्य खाते दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ लाख पेक्षा जास्त कार्ड जारी केली आहेत. यात १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्येला लाभ दिला जात आहे. आतापर्यंत ८८ हजार प्रक्रिया आयोजित केल्या आहेत. आपली नोंदणी www goaonline.gov in वर लॉगईन करुन डीडीएसएसवाय कार्ड क्रमांक घालावा. नंतर ओटीपी व्हॅलिडेट करावी आणि स्क्रीनवरील तपशीलाची छाननी करुन शुल्क प्रक्रिया चालू करावी. शुल्कानंतर पावती जनरेट होईल आणी कार्डचे नूतनीकरण हाेईल. अन्यथा जवळच्या डीडीएसएसवाय केंद्रावर भेट देऊन डीडीएसएसवाय कार्ड नूतनीकरण करु शकतात. यासाठी डीडीएसएसवाय कार्ड, आधारकार्ड आणि नुतनीकरणाची शुल्क घेऊन जावे.

वार्षिक नूतनीकरण शुल्क ३ किंवा कमी सदस्यांच्या कुटुंबासाठी २०० रुपये आणि ४ आणि त्यावरील सदस्याच्या कुटुंबासाठी ३०० रुपये. ओबीसी एससी एसटी आणि शारीरिक अपंग व्यक्तींसाठी त्यार ५० टक्के सवलतीबाबत त्यांचा विचार केला जाईल, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

नविन सदस्यांच्या नोंदणीसाठी सध्याच्या सदस्यांचे नाव गाळण्यासाठी तपशीलाच्या दुरुस्तीसाठी डीडीएसएसवाय केंद्रावर उपलब्ध असलेले ए/डी/सी फॉर्म भरा किवा www.goaonline.gov.in वरील फॉर्म भरा, कार्ड हरवल्यास ड्युप्लीकेट कार्ड जारी करण्यासाठी केंद्राकडे एल फॉर्मसह तक्रारीची प्रत सादर करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य खात्याच्या कॉल सेंटरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Call for DDSSY Card Renewal from Health Department goa health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा