शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

गोव्यात मंत्रिमंडळाचा विस्तार; बाबू कवळेकर यांच्यासह चार जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 4:00 PM

काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आज गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या तीन आमदारांसोबत एकूण चार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

- सदगुरू पाटीलपणजी : बाबू कवळेकर, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रीग्ज या चार नव्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी पार पडला. नवे उपमुख्यमंत्री म्हणून कवळेकर यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी विजय सरदेसाई, रोहन खंवटे, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणारा आदेश जारी केला.राजभवनवर शनिवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडला. कवळेकर, लोबो आणि जेनिफर या तिघांना आयुष्यात प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रीग्ज हे काही वर्षापूर्वी मंत्री होते. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. त्यांना आता सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले आहे.कवळेकर यांच्यासह एकूण दहा आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. बाबूश मोन्सेरात हे मंत्री होतील असे अपेक्षित होते. मात्र मोन्सेरात यांनी आपल्याला मंत्रीपद नको, आपली पत्नी जेनिफर यांना मंत्रीपद द्यावे अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री सावंत यांनी ते मान्य केले. जेनिफर ह्या ताळगाव मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

चौघे आऊटविद्यमान सरकारमध्ये बाबू आजगावकर हेही उपमुख्यमंत्री आहेत. आजगावकर हे पेडणो मतदारसंघाचे आमदार आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हेही उपमुख्यमंत्रीपदी होते. त्यांच्यासह गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास मुख्यमंत्री सावंत यांनी शुक्रवारी सांगितले होते. त्यांनी राजीनामा दिला नाही. अपक्ष  रोहन खंवटे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. म्हणून चौघांनाही मुख्यमंत्र्यांनी शनिवारी डच्चू दिला. सायंकाळी अनेक भाजप कार्यकत्र्याच्या उपस्थितीत राजभवनवर झालेल्या सोहळ्य़ावेळी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी चार नव्या मंत्र्यांना अधिकार व गोपनियतेची शपथ दिली. चारही मंत्र्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. सर्व मंत्री तसेच काही आमदार यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव परिमल रे यांनी सोहळ्य़ाची प्रक्रिया पार पाडली. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण