भाजपचा 'नवा अवतार', मंत्र्यांच्याच पसंतीचे मंडळ अध्यक्ष; ३६ मतदारसंघांत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 09:14 IST2025-01-06T09:12:33+5:302025-01-06T09:14:28+5:30
कोअर टीमची आज बैठक

भाजपचा 'नवा अवतार', मंत्र्यांच्याच पसंतीचे मंडळ अध्यक्ष; ३६ मतदारसंघांत निवड
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वेळ्ळी, बाणावली, नुवे व मडकई या चार मतदारसंघांमध्ये भाजपला मंडळ अध्यक्ष निवडता आलेले नाहीत. उर्वरित ३६ मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये मंत्री, आमदारांच्या पसंतीच्याच कार्यकर्त्यांची मंडळ अध्यक्षपदी निवड झालेली आहे. दरम्यान, अरुण सिंग यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता भाजप कोअर टीमची बैठक होणार आहे.
गटाचे वर्चस्व स्थापित झाले. माजी सरपंच तथा विद्यमान पंच हरिष नाईक यांची मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. नगरसेवक विश्वनाथ दळवी गटाचा हिरमोड झाला. पर्वरी मतदारसंघात विनीत परब यांची मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. पणजी मतदारसंघाच्या मंडळ अध्यक्षपदी ब्रिजेश शेट्ये यांची निवड करण्यात आली. शिवोली मंडळ अध्यक्षपदी मोहीत चोपडेकर यांची निवड झाली. आमदार डिलायला लोबो व माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांच्या समर्थकांमध्ये येथे चुरस होती. पेडणे मंडळ अध्यक्षपदी सिद्धेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली. याआधी काही मंडळ अध्यक्ष निवडलेले आहेत. त्यात दाबोळी मतदारसंघात माविन समर्थक सचिन चौगुले, मुरगांवात अविनाश नाईक, फातोर्डा मतदारसंघात श्वेता लोटलीकर यांचा समावेश आहे.
कुंभारजुवे मतदारसंघात आमदार राजेश फळदेसाई यांचे समर्थक योगेश पिळगांवकर मंडळ अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. सांताक्रुझमध्ये आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी पक्ष नेतृत्वाला मंडळ अध्यक्ष निवडण्यासाठी मुक्त हस्त दिला. येथे चिंबलचे सरपंच संदेश शिरोडकर यांचे नाव निश्चित झाले, अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष तानावडेच हवेत
प्रदेशाध्यक्षपदी सदानंद शेट तानावडे यांनाच कायम ठेवावे, अन्यथा २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ते मारक ठरू शकते, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले आहे. ते म्हणाले की, भाजपात सध्या तरी प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणीही योग्य व सक्षम व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे तानावडे यांनाच प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे.
राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग दाखल
दरम्यान, संघटनात्मक निवडणुका चालू असतानाच रविवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणिस तथा राज्यसभा खासदार अरुण सिंग गोव्यात दाखल झाले. त्यांचे राज्यात दोन दिवस वास्तव्य असून संघटनात्मक निवड प्रक्रिया पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहील.
प्रदेशाध्यक्षपदी तानावडेच?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांना पणजीत एका होटेलमध्ये काल गोव्याचे काही मंत्री, आमदार स्वतंत्रपणे भेटले. प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा सदानंद तानावडे यांचीच निवड करावी असे त्यांनी अरुण सिंग यांना सुचवले. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. तानावडे यांना २०२७ पर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून सेकंड टर्म मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्री माविन गुदिन्हो यांनी तर जाहीरपणेच काल तानावडे यांचे नाव सुचवले आहे.
प्रवीण आर्लेकर समर्थकांमध्ये नाराजी
पेडणे अध्यक्षपदी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पसंतीच्या व्यक्तीची वर्णी लागली नाही. त्यामुळे आर्लेकर यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, नूतन मंडल अध्यक्षपदी पेडणेकर यांची निवड झाली तेव्हा आमदार आर्लेकर उपस्थित होते. त्यांनी नाराजी बाजूला ठेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.