शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती धर्मियांवर अत्याचार; केंद्र बघ्याच्या भूमिकेत

By admin | Updated: March 1, 2015 02:31 IST

मडगाव : देशात ख्रिश्चन धर्मियांवर अत्याचार वाढू लागले असून, केंद्र सरकारही डोळे झाकून हा प्रकार बघत असल्याचा आरोप कॅथॉलिक असोसिएशन आॅफ

मडगाव : देशात ख्रिश्चन धर्मियांवर अत्याचार वाढू लागले असून, केंद्र सरकारही डोळे झाकून हा प्रकार बघत असल्याचा आरोप कॅथॉलिक असोसिएशन आॅफ गोवातर्फे आयोजित सभेत करण्यात आला. मडगावच्या लोहिया मैदानावर शनिवारी आयोजित या सभेत ख्रिस्ती धर्मियांवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला. या सभेपूर्वी कॅथॉलिक एकता रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन अनेक ख्रिस्ती धर्मीय यात सहभागी झाले होते. होली स्पिरीट चर्चहून या रॅलीला प्रारंभ होऊन शेवटी लोहिया मैदानावर त्याची सांगता झाली. डॉ. फ्रान्सिस कुलासो यांनी सभेत मार्गदर्शन केले. हल्ली देशात ख्रिस्ती समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळुरू येथे चर्चला हानी पोहचविण्यात आली, असे सांगून ख्रिस्ती धर्म हा नेहमी शांततेचे पालन करणारा आहे असे ते म्हणाले. धर्मांतर बंदी कायदा संसदेत संमत करण्याचा घाट रचला जात आहे. भारतीय घटनेत सर्वांना आपल्या धर्माचे पालन करण्याचा हक्क दिला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काही जहाल हिंदू घर वापसी सारखे कार्यक्रम राबवीत आहे. केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर ख्रिस्ती धर्मियांवर अत्याचार तसेच घर वापसीचे कार्यक्रम राबविण्यात आले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. धर्मांतर बंदी कायद्यासंबंधी मान्यवरांनी केलेली टिप्पणीही त्यांनी लोकासंमोर मांडली. अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही. एकजुटीने त्याला विरोध करू, असे ते म्हणाले. कॅप्टन अ‍ॅडी व्हिएगस यांनी भाषणात ख्रिस्ती धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांचा पाढाच या वेळी वाचला. मदर तेरेसांवरही बेछूट आरोप केले जात आहेत त्याला काय म्हणावे, असा सवाल त्यांनी केला. कॅथॉलिक असोसिएशन आॅफ गोवाचे धार्मिक संचालक फा. एमिल्डो पिंटो यांनीही वाढत्या अत्याचारांबद्दल खंत व्यक्त केली. सरकारने अल्पसंख्याक ख्रिस्ती धर्मियांना सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली. धर्मांतर बंदी कायदाही अस्तित्वात आणण्याची गरज नाही. घटनेने पूर्वीच लोकांना अधिकार दिलेले आहेत. हा कायदा अस्तित्वात आला तर मलभूत हक्कावर गदा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत चार ठरावही करण्यात आले. यात ख्रिस्ती धर्मियांंना सरंक्षण देण्याबरोबर धार्मिक स्थळांची नासधूस करण्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. घर वापसी सारख्या कार्यक्रमातून दहशत व बळाचा वापर केला जात असून, त्यावर कारवाई करावी, धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आला तर घटनेने दिलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होणार असल्याने त्यास विरोध करणे तसेच घटनेने सर्वांना धर्मासंबंधी स्वातंत्र्य दिले असल्याने त्यास कुणी हरकत घेऊ नये, या आशयाचा ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)