शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर गोव्याचा बहुतेक भाग अंधारात

By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST

पणजी : वीज खात्याने मान्सूनपूर्व कामांचा न केलेला निपटारा, तसेच खात्याच्या बेजबाबदारपणाचे पितळ जोरदार वार्‍या पावसाने पुन्हा एकदा उघडे पडले.

पणजी : वीज खात्याने मान्सूनपूर्व कामांचा न केलेला निपटारा, तसेच खात्याच्या बेजबाबदारपणाचे पितळ जोरदार वार्‍या पावसाने पुन्हा एकदा उघडे पडले. उत्तर गोव्यातील बहुतांश भाग सोमवारी रात्री अंधारात बुडाला. अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली. वीजपुरवठा खंडित राहिला. सत्तरी, डिचोली, पेडणे, तिसवाडी व बार्देस तालुक्यांना मोठा फटका बसला. बार्देसमध्ये तर अर्धा अधिक भाग सोमवारी अंधारात राहिला. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली. वीज नसल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही व त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. काही भागांत २४ तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांनी सरकारच्या नावाने ठणाणा केले. राजधानीचे उपनगर मानल्या जाणार्‍या पर्वरीत तब्बल १४ तास वीज गायब होती परिणामी असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पर्वरीतील रहिवाशांना सकाळी आंघोळीसाठीही पाणी न मिळाले नाही. त्यांना रजा टाकून घरी राहावे लागले. वीज गडप झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना लाही- लाही झाले. वीज नाही म्हणून पाणीही नाही, असा प्रकार अनेक ठिकाणी घडला. पर्वरीत दिवसभर लोकांना पाणी मिळाले नाही. वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंप सुरू होऊ न शकल्याने पाणी सोडता आले नाही. लोकांनी पाण्यासाठी बाटल्यांचा वापर केला. बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) दत्तात्रय बोरकर यांना विचारले असता, वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचे सांगून त्यांनी वीज खात्यावरच खापर फोडले. १९ मे रोजी पहिल्या पावसातही गडगडाटामुळे थिवी उपकेंद्रातून येणारी ११0 केव्हीची वाहिनी तुटल्याने वीज गायब होऊन लोकांना मोठा त्रास झाला होता. त्यानंतर पर्वरीत दोन वेळा ‘शट डाउन’ घेऊन मान्सूनपूर्व कामे करण्यात आली; परंतु त्याचाही काही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)