वास्को ते अयोध्या विशेष रेल्वेची घोषणा; आस्था स्पेशल एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 07:49 AM2024-01-23T07:49:08+5:302024-01-23T07:50:35+5:30

अयोध्येजवळील दर्शन नगर रेल्वे स्थानकावर शेवटचा थांबा घेईल.

announcement of goa to ayodhya special train | वास्को ते अयोध्या विशेष रेल्वेची घोषणा; आस्था स्पेशल एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

वास्को ते अयोध्या विशेष रेल्वेची घोषणा; आस्था स्पेशल एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण पश्चिम रेल्वेने गोवा ते अयोध्या 'आस्था स्पेशल एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे घोषित केली आहे. रेल्वे गाडी क्रमांक ०६२०५ वास्को रेल्वे स्थानकावरून सुटेल व अयोध्येजवळील दर्शन नगर रेल्वे स्थानकावर शेवटचा थांबा घेईल.

वास्को येथून सोमवारी १२ आणि २६ फेब्रुवारी तर दर्शननगर येथून शुक्रवार, १६ फेब्रुवारी आणि १ मार्च अशी ही रेलगाडी सुटेल. माजोर्डा, मडगाव, करमळी, रत्नागिरी, पनवेल, वापी, कोटा, तुंडला, प्रयागराज, मिर्झापूर या भागातून ती जाईल. या रेल्वेत २२ कोच असतील आणि २,७९१ कि.मी.चा एकेरी प्रवास असेल.

Web Title: announcement of goa to ayodhya special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.