लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कुंडई येथील गौरव नाईक याचे क्रिकेट खेळावर जिवापाड प्रेम. लहानपणापासूनच तो मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचा. वयाची पन्नाशी गाठली तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम जरासुद्धा कमी झालेले नव्हते. आपला रिक्षा व्यवसाय सांभाळून तो क्रिकेट खेळायचा. अशा या क्रिकेटवेड्या गौरेशचे क्रिकेटच्या मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.
कुंडई येथील गौरेश नाईक हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दर रविवारी तो आपल्या समवयस्क क्रिकेटप्रेमींसोबत ठिकठिकाणच्या मैदानांवर क्रिकेट खेळण्यासाठी जायचा. राज्यात जेथे व्हेटनर्स म्हणजे ज्येष्ठांच्या क्रिकेट स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धामध्येसुद्धा तो आपल्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत भाग घ्यायचा. या वयातसुद्धा तो चमकदार कामगिरी करत असे.
रविवारी नेहमीप्रमाणेच सुटी असल्याने तो मित्रांबरोबर मडकई येथील शनिशनेश्वर मंदिराजवळील मैदानावर क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असतानाच तो अचानक तिथेच पडला. मित्रांनी त्याला तातडीने इस्पितळात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. एका क्रिकेटवेड्या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Summary : Gouresh Naik, a cricket enthusiast from Kundaim, Goa, collapsed and died of a heart attack while playing cricket. The rickshaw driver, known for his passion for the sport, was a regular participant in veteran cricket tournaments. His sudden death on the field has caused widespread grief.
Web Summary : गोवा के कुंदई में क्रिकेट के शौकीन गौरेश नाइक का क्रिकेट खेलते समय दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। रिक्शा चालक, खेल के प्रति अपने जुनून के लिए जाने जाते थे, वेटरन क्रिकेट टूर्नामेंट में नियमित रूप से भाग लेते थे। मैदान पर उनकी अचानक मौत से व्यापक शोक है।