रेल्वे इंजिनच्या खाली चिरडल्याने एक वृध्द ठार; माजोर्डा येथील घटना
By सूरज.नाईकपवार | Updated: December 17, 2023 16:50 IST2023-12-17T16:50:12+5:302023-12-17T16:50:23+5:30
गोव्यातील माजोर्डा येथे लोकोमोटिव रेल्वे इंजिनचा खाली चिरडल्याने एक ७७ वर्षीय वृध्दा ठार झाली.

रेल्वे इंजिनच्या खाली चिरडल्याने एक वृध्द ठार; माजोर्डा येथील घटना
मडगाव : गोव्यातील माजोर्डा येथे लोकोमोटिव रेल्वे इंजिनचा खाली चिरडल्याने एक ७७ वर्षीय वृध्दा ठार झाली. आज रविवारी पहाटे सात वाजण्याच्या दरम्यान कोकण रेल्वे पोलिसांना स्टेशन मास्तरकडून यासंबधी माहिती देण्यात आली. रोझा फर्नाडीस असे मयताचे नाव असून, ती माजोर्डा येथील गोम्सवाडा येथील रहिवाशी आहे. माजोर्डा चर्चजवळील रेल्वे गेट जवळ वरील घटना घडली. मयत सकाळी चर्चमध्ये प्रार्थनासाठी जात होती की नाही याचा सदया कोकण रेल्वे पोलिस शोध घेत आहेत. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे, कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.