मडगावच्या रेल्वे स्थानकावर ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला

By सूरज.नाईकपवार | Updated: January 5, 2024 20:51 IST2024-01-05T20:50:53+5:302024-01-05T20:51:04+5:30

कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.

An 82-year-old man was found dead at the railway station of Madgaon | मडगावच्या रेल्वे स्थानकावर ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला

मडगावच्या रेल्वे स्थानकावर ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला

मडगाव: मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर एक ८२ वर्षीय वृध्द मृतावस्थेत सापडला. मयताकडे सापडलेल्या आधारकार्डावरुन त्याची ओळख पटली. हंस राज असे त्याचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील ललितपूर येथील आहे. तो साधू असल्याची माहिती मयताच्या कुटुंबियांकडून पोलिसांना मिळाली आहे.

कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता तेथील डॉक्टारांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत.

मयताचा मृत्यू हा नैसर्गिक असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे नेमके निदान स्पष्ट होणार आहे.मयताकडे सापडलेल्या आधारकार्डावरील पत्त्याच्या मदतीने पोलिसांनी मयताच्या कुटुंबीयाकडे संपर्क साधून या घटनेची माहिती संबधितांना दिली आहे. ते गोव्याकडे मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: An 82-year-old man was found dead at the railway station of Madgaon