एअर एशियाच्या विमानात पुन्हा बिघाड; दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:14 IST2018-10-01T16:13:19+5:302018-10-01T16:14:40+5:30
विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले.

एअर एशियाच्या विमानात पुन्हा बिघाड; दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडींग
वास्को : गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून १६८ प्रवाशांना घेऊन बंगळूरसाठी जाण्याकरीता उड्डाण घेतलेल्या एअर एशियाविमानात सोमवारी (दि.१) सकाळी तांत्रिक बिघाड आल्याने हे विमान त्वरित पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले.
सोमवारी सकाळी ७.३५ च्या सुमारास सदर घटना घडली. एअर एशियाचे ‘आय ५१३२’ ह्या विमानाने दाबोळी विमानतळावरून बंगळुरला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड होत असल्याचे वैमानिकाला जाणवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी याबाबत दाबोळी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांना याची माहीती देऊन पुन्हा विमान उतरवण्यासाठी परवानगी घेतल्यानंतर १० मिनिटाच्या विमान येथे उतरविले. एअर एशिया विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान येथे उतरवण्याची ह्या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे कळविले.
या विमानातील १६९ प्रवाशांना बंगळूरला जाणाऱ्या अन्य विमानांमध्ये सोय करण्य़ात आली.