शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

गोवा : काँग्रेस पराभवाचा निरीक्षक रजनी पाटील यांनी केला पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 07:33 IST

पराभूत उमेदवार, पदाधिकारी यांच्याशी चर्चा

पणजी : गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक, राज्यसभा खासदार रजनी पाटील बुधवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर दाखल झाल्या. म्हापसा व पणजी येथे त्यांनी पराभूत उमेदवारांकडून अपयशाची कारणे जाणून घेतली.श्रीमती पाटील पक्षाच्या निवडून आलेल्या काही आमदारांनाही भेटल्या. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेतल्या.गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी काँग्रेसने गोवा फॉरवर्ड बरोबर युती करुन स्वत: ३७ जागा लढविल्या होत्या तर, गोवा फॉरवर्डने ३ जागा लढविल्या होत्या. काँग्रेसला ११ तर, फॉरवर्डला केवळ १ जागा मिळाली. या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेऊन पायउतार व्हायला लावले.उमेदवारांच्या पराभवासाठी काही मतदारसंघात रचले कट कारस्थान मत विभागणीमुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे श्रीमती पाटील यांनी या प्रतिनिधीला सांगितले. त्या म्हणाल्या की, आप, तृणमूल तसेच इतर पक्षांमध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाली. पराभवामागची कारणे आपण चर्चेदरम्यान जाणून घेतल्याचे त्या म्हणाल्या.  काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी काही मतदार संघात कट कारस्थान रचण्यात आले. काही मतदार संघात मतांची विभागणी झाली तर भाजपाची मते एकसंध राहिल्याने पराभव झाल्याचे पाटील म्हणाल्या.लवकरच होणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकीत पक्ष पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरणार आहे. बूथ संघटना तसेच इतर विविध संघटनांकडून त्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा पक्ष बाळगत असल्याचे पाटील यांनी सांगितले. हा अहवाल केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना सादर केला जाणार असून त्यानंतर लवकरच प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.दरम्यान, यावेळी आमदार मायकल लोबो यांनी पक्षाने तळागाळात जाऊन लोकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्याची क्षमता असलेल्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस