वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 13:26 IST2018-11-06T13:14:48+5:302018-11-06T13:26:42+5:30

दिवाळीच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ahead Of Diwali, Manohar Parrikar's Audio Message For People Of Goa | वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...!

वेदनादायी आयुष्यातही पर्रीकर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत...!

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या घरीच राहिलेले आहेत. ते दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानातून काम करत असल्याचे काहीवेळा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. दिवाळीच्या निमित्तानेमनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एफ.एम. रेडिओच्या माध्यमातून गोव्याच्या जनतेपर्यंत त्यांच्या शुभेच्छा पोहोचवण्यात आल्या. 'नमस्कार. मी गोव्याच्या सर्व जनतेला दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. येणारं वर्ष हे तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारं आणि जीवनात आनंदाची बरसात करणारं ठरो. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा..', अशा शुभेच्छा मनोहर पर्रीकर यांनी दिल्या आहेत. गोव्यातील प्रसिद्धी आणि माहिती खात्यातर्फे पर्रिकरांच्या शुभेच्छा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

Web Title: Ahead Of Diwali, Manohar Parrikar's Audio Message For People Of Goa