महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक
By पूजा प्रभूगावकर | Updated: July 11, 2023 17:50 IST2023-07-11T17:48:56+5:302023-07-11T17:50:31+5:30
महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक: कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक
पणजी: राज्यात वाढती महागाई तसेच बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसने आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मंगळवारी धडक मोर्चा नेला. यावेळी आंदोलनकर्त्या युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
कांदा, टोमॅटो, एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमती, बेरोजगारीची वाढती टक्केवारी तसेच राज्य सरकारला बेरोजगारांना नोकऱ्या देण्यास आलेल्या अपयशाविरोधात युवक कॉंग्रेसने पणजी येथील आझाद मैदान ते आल्तीनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असा धडक मोर्चा नेला. यावेळी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कांदा, टोमॅटाे तसेच हिरव्या मिरच्यांची माळ गळ्यात घातली होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरच चुल पेटवून भज्जी तळली.
पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरताच हा मोर्चा अडवला
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आम्हाला भेटायचे आहे, मुख्यमंत्री हॅलो गोंयकार हा कार्यक्रम करतात, मात्र राज्यातील युवकांना भेटत नाही, रोजगार देण्यास अपयशी ठरल्याने ते आपले अपयश लवपू पहात आहे, टोमॅटो १२० रुपये किलो इतके झाले असून तो १५० रुपये किलो होण्याच्या मार्गावर आहे. मात्र सरकार या वाढत्या किंमतींवर नियंत्रण आणू पहात नसल्याचा आरोप युवक कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी रुची भार्गवा यांनी यावेळी केला.