'आप'ची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:39 IST2023-09-27T13:38:18+5:302023-09-27T13:39:44+5:30

वाल्मिकी नायक उत्तरेचे तर जर्सन गोम्स दक्षिणेचे कार्यकारी अध्यक्ष

aap party new state executive announced in goa | 'आप'ची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

'आप'ची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आम आदमी पक्षाने नवी राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर आमदार वेंझी व्हिएश व आमदार क्रुझ सिल्वा यांची पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.

यासंबंधीचा आदेश पक्षाचे आयोजन सरचिटणीस संदीप पाठक यांनी हा आदेश काढला आहे. आपची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून वाल्मीकी नायक उत्तर गोवा कार्यकारी अध्यक्ष तर जर्सन गोम्स दक्षिण गोवा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले गेले आहेत. प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर देसाई, सिध्देश भगत, सुनील शिंगणापूरकर, रॉक मास्कारेन्हस सुरेल तिळवे या पाच जणांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रचार व दळणवळण विभागाचे सरचिटणीस म्हणून फ्रान्सिस कुएलो यांची नियुक्ती केली आहे. सिध्देश भगत हे मुख्य प्रवक्ते आहेत.

सुषमा गावडे उत्तर गोवा महिला अध्यक्ष, पॅट्रिसिया फर्नांडीस दक्षिण जिल्हाध्यक्ष, अनिल गांवकर एसटी विभाग अध्यक्ष, उपेंद्र गांवकर ओबिसी उपाध्यक्ष, हॅझेल फर्नांडिस अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत. युवा अध्यक्षपदी रोहन नाईक यांची नियुक्ती केली आहे.

 

Web Title: aap party new state executive announced in goa