भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:34 IST2026-03-06T12:34:24+5:302026-03-06T12:34:24+5:30

आम आदमी पार्टीने पणजी येथे मोर्चा काढून दिल्ली मद्यधोरण प्रकरणाबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या आणि राजकीय हेतूने तयार केलेल्या कथानकाचा निषेध केला.

aap marches to BJP office in goa protests political vendetta | भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध

भाजप कार्यालयावर आपचा मोर्चा, राजकीय सुडाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:आम आदमी पार्टीने पणजी येथे मोर्चा काढून दिल्ली मद्यधोरण प्रकरणाबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या आणि राजकीय हेतूने तयार केलेल्या कथानकाचा निषेध केला. या आंदोलनात वाल्मिकी नायक, जर्सन गोम्स, संदेश तेलेकर, प्रशांत नाईक, मॅन्युएल कार्दोजो, हर्टन फर्नाडिस, सरफराज अन्कलगी, विश्वजित शिरोडकर, कार्यकर्ते सहभागी झाले.

आपगोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीची प्रतिमा खराब करण्यासाठी दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याचा खोटा आरोप तयार करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केजरीवालांची माफी मागावी, अशी मागणी केली. आपचे कार्याध्यक्ष जर्सन गोम्स यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

मद्यधोरण खटला जाणीवपूर्वक गोव्याशी जोडून कथित घोटाळ्यातील ४५ कोटी रुपये गोव्याच्या निवडणुकीत वापरले गेल्याचा आरोप करण्यात आला. आपचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांनी सांगितले की भाजप सत्तेत आल्यापासून देशभरातील विरोधकांचा आवाज खोट्या खटल्यांद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशांत नाईक, मॅन्युएल कार्दोज यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

वाल्मिकींसह इतरांवर गुन्हे

आपचे नेते वाल्मिकी नायक आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पणजी शहरात काढलेल्या मोर्चामुळे कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले असतानाही आपकडून रॅलीचे आयोजन केले होते.
 

Web Title : आप का भाजपा कार्यालय पर प्रदर्शन, राजनीतिक प्रतिशोध की निंदा

Web Summary : आप ने पणजी में दिल्ली शराब नीति मामले में झूठे आरोपों के खिलाफ प्रदर्शन किया, सीएम सावंत से माफी की मांग की। नेताओं ने झूठे मामलों के माध्यम से विपक्ष की आवाज़ को दबाने और मामले को गोवा चुनावों से जोड़ने की सरकार की आलोचना की।

Web Title : AAP Protests BJP Office, Condemns Political Vendetta in Goa

Web Summary : AAP protested in Panaji against false allegations in the Delhi liquor policy case, demanding an apology from CM Sawant. Leaders criticized the government's suppression of opposition voices through false cases and the linking of the case to Goa elections.