दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक जखमी
By आप्पा बुवा | Updated: April 18, 2023 19:43 IST2023-04-18T19:42:33+5:302023-04-18T19:43:34+5:30
संबंधित व्यक्तीला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे...

दोन दुचाकी दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक जखमी
फोंडा - रथामळ कपिलेश्वरी येथे मंगळवारी दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्याने स्कूटर स्वार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तानुसार सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान रणजीत कवळेकर( राहणार कवळे )हा आपली स्कूटर क्रमांक जीए -०५- एन- ३०७६ ने फोंड्याच्या दिशेने येत होता. त्याचवेळी साखळी येथील दीपराज देसाई हा आपल्या स्प्लेंडर क्रमांक जीए- ०२- एम- ०७५३ ने कवळेच्या दिशेने जात होता. रथामळ या ठिकाणी दिपराज याने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या रणजीतला धडक दिली. सदर अपघातात दोघेही जण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये रणजीत कवळेकर हा गंभीर जखमी झाला असून ,त्याला सुरुवातीला सब जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ह्या अपघातात दिपराज हा किरकोळ जखमी झालेला आहे.
फोंडा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.