थेट शाळेत घुसून शिक्षकाला मारला ठोसा; चिंबल विद्यालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 18:39 IST2023-09-16T18:39:21+5:302023-09-16T18:39:38+5:30

अचानक संशयित कार्यालयात घुसला आणि त्याने शिकाला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला.

A teacher was punched by entering the school directly Chimbal Vidyalayas goa | थेट शाळेत घुसून शिक्षकाला मारला ठोसा; चिंबल विद्यालयातील प्रकार

थेट शाळेत घुसून शिक्षकाला मारला ठोसा; चिंबल विद्यालयातील प्रकार

पणजी: चिंबल येथील हुस्न कोंकणी विद्यालयातील शिक्षिकेला शाळेत शिरन मारहाण करण्याची घटना घडली आहे. हल्लेखोर एका एकी शाळेत घुसला आणि शिक्षकावर जोरात ठोसा मारला आणि नंतर मारहाण सुरू केली. 

या प्रकरणात जुने गोवा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  पोलिसांनी संशयित इम्रान मुन्नासाब हेबोली याला अटक केली आहे. 
जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यालयाच्या प्राथमिक शिक्षक अनीस खान हे विद्यालयाच्या कार्यालयात होते. अचानक संशयित कार्यालयात घुसला आणि त्याने शिकाला शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला.   त्याच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारून त्याला खाली पाडले आणि नंतर ठार मारण्याची धमकी दिली. इतर शिक्षकांनाही धमकावले. तसेच विद्यालयातील साहित्याची मोडतोड केली असे या विद्यालयाच्या मुख्याद्यापिका लीन परेरा रॉड्रिगीश यांनी नोंदविली आहे.

हा हल्लेखोर चिंबलमधीलच असून त्याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. थेट शाळेत घुसून शिक्षकावर हल्ला करण्याचा प्रकार संपूर्ण राज्यात अलिकडच्या काळात तरी पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकाराची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: A teacher was punched by entering the school directly Chimbal Vidyalayas goa