गोव्यातील सासष्टी तालुक्यात दुचाकी अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: November 23, 2023 18:13 IST2023-11-23T18:11:44+5:302023-11-23T18:13:10+5:30

दोन दुचाकीमध्ये झाला अपघात.

a senior citizen died in a two wheeler accident in goa sasashti taluka in madgaon | गोव्यातील सासष्टी तालुक्यात दुचाकी अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

गोव्यातील सासष्टी तालुक्यात दुचाकी अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील तेंबी कामुर्ली येथे दोन दुचाकीमध्ये अपघात होउन जखमी झालेल्या तुळशीदास नाईक (७७) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला गोमेकॉत घेउन जात असताना वाटेतच त्याचे निधन झाले. बुधवारी सायंकाळी अपघाताची वरील घटना घडली. मायणा कुडतरी पोलिसांनी नंतर घटनास्थळी जाउन या अपघाताचा पंचनामा केला. या अपघात प्रकरणात पोलिसांनी संशयित दुचाकी चालक अल्टन ली फर्नांडीस (३४) याच्या विरोधात भादंसंच्या ३०४ (अ) व ३२४ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी हा पुढील तपास करीत आहेत.

संशयित फर्नांडीस हा आपल्या स्कुटरवरुन मडगावहून फोंडाच्या दिशेने जात असताना त्याने विरुध्द दिशेने येणाऱ्या अन्य एका दुचाकीला धडक दिली. यात त्या दुचाकीवरील तुळशीदास नाईक हे रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांना गोमेकॉत नेत असताना त्यांना मृत्यू आला. मयत साेलवा राय येथील रहिवाशी हाेते.

Web Title: a senior citizen died in a two wheeler accident in goa sasashti taluka in madgaon