शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पर्वरीतील भीषण अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:01 IST

मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

शेखर वायंगणकर -

पर्वरी : पर्वरी महामार्गावरील डेल्फिनो सुपरमार्केट समोर नशेत असलेल्या थार जीप चालकाने स्कुटरला जोरदार धडक दिल्याने दिव्यांग व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. कित्तू बेहरा (५१,म्हापसा) असे या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. 

पर्वरीचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मंगळावरी (दि.१६) पहाटे पाच वाजता पणजीमार्गे जाणाऱ्या थार जीपने (जीए-०३ झेड-६१८८) डेल्फिनो सुपरमार्केटसमोर एका स्कुटरला (जीए-०३,एसी-८८२९) मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील दिव्यांग कित्तू बेहरा (५१,म्हापसा) जागीच ठार झाले. जीप चालक नरेश जैन (४१, रा. वसई-महाराष्ट्र) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठविले असता त्याने मद्यपान केले असल्याचे आढळले. सहायक उपनिरीक्षक संजीव साळुंके यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहेत. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर  अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जात असल्याने अपघात वाढले आहेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस