वेर्णा महामार्गावरील अपघातात २३ वर्षीय तरुणाचा अंत

By पंकज शेट्ये | Updated: April 30, 2023 16:07 IST2023-04-30T16:07:19+5:302023-04-30T16:07:58+5:30

टेम्पो आणि चारचाकीत समोरासमोरून जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. 

A 23-year-old youth died in an accident on Verna highway, goa | वेर्णा महामार्गावरील अपघातात २३ वर्षीय तरुणाचा अंत

वेर्णा महामार्गावरील अपघातात २३ वर्षीय तरुणाचा अंत

वास्को: रविवारी (दि.३०) पहाटे दक्षिण गोव्यातील वेर्णा बायपास महामार्गावर सिमेंट नेणारा टेम्पो आणि चारचाकीत समोरासमोरून धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात चारचाकी चालकाचा जागीच अंत झाला. अपघातात जागीच मरण पावलेल्या चारचाकी चालकाचे नाव मॅक आर्थर परेरा (वय २३) असे असून तो तरुण उर्तोडा भागातील रहिवाशी असल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली. 

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविवारी पहाटे ६.१५ च्या सुमारास तो भीषण अपघात घडला. वेर्णा बायपास जवळील महामार्गावरून सिमेंट नेणारा टेंम्पो (क्र: जीए ०८ यू १४५१) मडगावहून पणजीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पणजीहून मडगावच्या दिशेने जाणा-या चारचाकी (क्र: जीए ०८ एम ७६००) वाहनाने येऊन समोरासमोरून टेम्पोला जबर धडक दिली. टेम्पो आणि चारचाकीत समोरासमोरून जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. 

दोघांनाही उपचारासाठी मडगाव जिल्हा इस्पितळात नेले असता चारचाकी चालक मॅक आर्थर याचा इस्पितळात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीसांना अपघाताची माहीती मिळाताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच पोलीसांनी अपघातात मरण पोचलेल्या मॅक आर्थर याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला. वेर्णा पोलीस त्या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करित आहेत.

Web Title: A 23-year-old youth died in an accident on Verna highway, goa

टॅग्स :Accidentअपघात