शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

२४ तासांत राज्यात ९.२६ इंच पाऊस, आतापर्यंत ५८ इंच पावसाची नोंद, सर्वाधिक वाळपईत ७१ इंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:32 IST

राज्य हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असून आजही राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

नारायण गावस

पणजी: रविवार पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या २४ तासांत तब्बल ९.२६ इंच पावसाची नोंद झाली त्याचप्रमाणे राज्यात आतापर्यंत  एकूण ५८ इंच पावसाची नोंद  झाली आहे. राज्य हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असून आजही राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक जास्त पाऊस हा राजधानी पणजी केंद्रांत नोंद झाला आहे. राजधानीत गेल्या २४ तासांत १४ इंच पावसाची नोंद झाली तर ओल्ड गाेवा केंद्रावर १३ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्याच्या  खालोखाल  म्हापसा केंद्रावर ११.६ इंच पावसाची नाेंद झाली आहे. राज्यात बहुतांश केंद्रावर गेल्या २४ तासांत माेठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस वाळपई केंद्रात नोंद झाल आहे. वाळपई एकूण ७१ इंच पाऊस झालेला आहे. तर सांगे केंद्रात ६८.४  इंच तर साखळीत ६५.५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी आलेल्या पुराने अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे.  ठिकठिकाणी झाडे पडली रस्ते खचले  लोकांच्या घरात पाणी  शिरले त्यामुळे अग्निशमन दलाला दिवसभर घटनांचे कॉल येत होते.  दलाच्या जवानांनी  घटनास्थळी जाऊन अनेक लोकांना लोकांना सहकार्य केले. आजही  राज्यात बहुतांश ठिकाणी जाेराचा पाऊस सुरच आहे. अनेक भागात पुरस्थित असल्याने लोकांना मोठा त्रास झालेला आहे.

हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी रेड अर्लट दिल्याने आज राज्यात १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. विद्यार्थ्यांना पुराच्या पावसाचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. तसेच अनेक रस्त्यावर आजही पावसाने  पाणी साचले आहे. तसेच नदीला पुर आलेला आहे.  अनेक शेतकऱ्यांच्या शेती  बागायतीत  पाणी  शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस