शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुडा’तर्फे राज्यात ६0 कोटींचे प्रकल्प

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

पणजी : ‘सुडा’चे ६0 कोटींचे वेगवेगळे प्रकल्प मार्गी लागले आहेत.

पणजी : ‘सुडा’चे ६0 कोटींचे वेगवेगळे प्रकल्प मार्गी लागले आहेत. म्हापशात २0 कोटी रुपये खर्चून सौंदर्यीकरण, तसेच भाजी मार्केट बांधण्यात येत असून वाळपईत १२ कोटींचा मार्केट प्रकल्प होत आहे. सांगे, काणकोण, साखळी येथेही बांधकामे चालू आहेत. सांगे येथे कबरस्थान तसेच मार्केट प्रकल्पाचे काम चालू आहे, अशी माहिती ‘सुडा’चे उपाध्यक्ष राजसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केपे, मुरगाव, फातोर्डा भागातही नव्या प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. पालिका प्रशासन संचालक एल्विस गोम्स हेही या वेळी उपस्थित होते. एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, बहुतांश पालिकांनी कचरा प्रकल्पांच्या बाबतीत अहवाल सादर केलेले आहेत. डिचोली येथील कचरा प्रकल्प चांगल्या पध्दतीने चालू आहे. घरोघरी फिरून कचरा गोळा करण्याचे कामही तेथे बर्‍यापैकी चालू असून प्रयोग १00 टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा त्यांनी केला. फोंड्यात ५0 टक्के प्रयोग यशस्वी झालेला आहे. घरोघरी फिरून कचरा गोळा करणे व तो वेगवेगळा काढणे याबाबत मडगाव पालिकेने मात्र काहीच काम केलेले नसल्याचे गोम्स यांनी सांगितले. या वेळी सल्लागार गौरव पोकळे हेही उपस्थित होते. येत्या ५ रोजी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. ओला व सुका कचरा कसा हाताळावा याबाबत राज्यस्तरीय परिषद होणार आहे. घन कचर्‍याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याने त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पालिकांना कचराकुंड्या, ट्रॉली देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मनपाच्या कचरा विल्हेवाटीसाठी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ताळगावात २५ हजार चौरस मीटर जमीन देऊ केली आहे त्याबाबत विचारले असता तसा अधिकृत प्रस्ताव अजून आलेला नाही, असे पालिका प्रशासन संचालकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)