आमदार वीरेश बोरकर, मनोज परब यांच्यासह ५० जण निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:35 IST2025-10-20T12:35:06+5:302025-10-20T12:35:39+5:30
या सर्वांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर आरोप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

आमदार वीरेश बोरकर, मनोज परब यांच्यासह ५० जण निर्दोष
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : शेळ मेळावली येथील आंदोलनाच्या संदर्भातील खटल्यातून आमदार वीरेश बोरकर, आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यासह ५० जणांची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ३ सप्टेंबर २०२० रोजी संबंधित पंचायतीच्या सरपंच तसेच इतरांना पंचायतीतून बाहेर पडण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या सर्वांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर आरोप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
तसेच, सर्व संशयितांनी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि तोंडावर मास्क न घालता ते सामाजिक अंतर राखण्यात अयशस्वी ठरले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या १४४ कलमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत येथील न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.
संशयितांविरुद्ध ठेवण्यात आलेली सर्व कलम रद्द करण्याचे तसेच पुढील कार्यवाही थांबविण्याचा आणि सर्व संशयितांना भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, ३४१ आणि ५०४ गुन्ह्यांमधून मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे.