शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कदंबच्या ५० बसेस भंगारात; १५ वर्ष जुन्या वाहनांचा 'निकाल', महामंडळाला बसेसची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:55 IST

राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत

नारायण गावस, पणजी: केंद्र सरकारच्या १५ वर्ष जुनी वाहने भंगारात काढण्याच्या नवीन कायद्याचा कदंब महामंडळाला बराच फटका बसला आहे. कदंब महामंडळाने एकूण ५० जुन्या १५ वर्षापर्यंतच्या बसेस भंगारात काढल्या.  तसेच काही बसेस बंद आहेत. त्यामुळे सध्या महामंडळाकडे बसेसची कमतरता भासत आहे.  यासाठी राज्य सरकारने आणखी ५० बसेस घेण्याची परवानगी दिली आहे. आणि १०० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले

तुयेकर म्हणाले, सध्या कदंब महामंडळाच्या आंतरराज्य मार्गावरील अनेक बसेस बंद आहेत. तसेच ग्रामीण भागातही काही बसेसची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे  राज्यभरातील विविध शाळांमध्ये अजूनही सुमारे ७० बसेसची आवश्यकता आहे.  यासाठी  महामंडळाला १०० इलेक्ट्रिक बसेस हैदराबादच्या एका कंपनीकडून येणार आहे. यांतील फक्त त्यांनी ४ बसेस आल्या आहेत. आणखी  ९६ बसेस दिल्या जाणार आहेत. या बसेस आम्ही शाळा तसेच ग्रामीण भागात घालणार आहोत. तसेच सरकार ५० डिझेलच्या बसेस देणार त्या आंतरराज्य मार्गावर घातल्या जाणार आहेत.

तुयेकर पुढे म्हणाले, राज्यात  स्मार्ट  सिटी पणजीसाठी  मिनी कंदब इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. पण अजून पणजी स्मार्ट  सिटीची कामे पूर्ण झालेली नाही त्याचप्रमाणे शहरातील अन्य खासगी बसेस आहे त्या मालकांशी चर्चा करुन व  याेग्य ताेडगा काढून  या बसेस सुरु केल्या जाणार आहेत. या लोकांच्या पोटावर आड येणार नाही असेही तुयेकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा