शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

गोव्यात ४ तासांत २६ कोरोनाबळी, ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 4:47 AM

गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत. 

सदगुरू पाटील -पणजी : गोव्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनत आहे. कोरोनामुळे जाणाऱ्या बळींची संख्याही वाढत आहे. मंगळवारीही पहाटे २ ते ६ या वेळेत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये २६ कोरोना रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. यानिमित्ताने हॉस्पिटलमधील ऑक्सिजन तुटवड्याचा वाद समोर आला आहे. यावरून सरकारमधील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हेच आमने-सामने आले आहेत. गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर येताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी ११ च्या सुमारास गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी थेट कोविड वाॅर्डमध्ये प्रवेश केला व रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना थेट सांगितले की, सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही, परंतु रुग्णांपर्यंत हा वेळेत पोहोचत नाही. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे व्यवस्थापन नीटपणे होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आक्षेप घेतला. राणे म्हणाले, गैरव्यवस्थापन वगैरे होत नाही, मुख्यमंत्र्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. गोव्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा आहे. जिथे १२०० सिलिंडर हवे तिथे फक्त ४०० मिळत आहेत. पहाटे चार तासांमध्ये जे २६ मृत्यू झाले, त्याची उच्च न्यायालयाने चौकशी करावी.  

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस