शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

१७५० च्या बुटांसाठी २0 हजारांची भरपाई

By admin | Updated: December 5, 2014 01:05 IST

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव साडेसतराशे रुपयांच्या बुटांचा परतावा देण्यास नकार दिलेल्या पणजीतील हिल्स या पादत्राणांच्या आस्थापनाला सध्या ग्राहक मंचाचा दणका सोसावा लागला आहे.

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव साडेसतराशे रुपयांच्या बुटांचा परतावा देण्यास नकार दिलेल्या पणजीतील हिल्स या पादत्राणांच्या आस्थापनाला सध्या ग्राहक मंचाचा दणका सोसावा लागला आहे. या साडेसतराशेच्या बुटांसाठी पर्वरी येथील बेमविंदा डायस या महिलेला तब्बल २0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. संजय चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली या मंचाच्या सदस्य अ‍ॅड. वर्षा बाळे यांनी २८ नोव्हेंबरला हा निकाल दिला. या दाव्याची पार्श्वभूमी अशी : पर्वरी येथील बेमविंदा डायस यांनी हिल्स या पादत्राणांच्या दुकानातून १७५0 रुपयांचे बूट खरेदी केले होेते. मात्र, ज्या दिवशी हे बूट खरेदी केले त्याच दिवशी एका बुटाचा हिल तुटून या पादत्राणाचा कपडाही फाटला. त्यामुळे नवीन बूट देण्यात यावेत, अशी मागणी डायस यांनी या आस्थापनाकडे केली होती. मात्र, बूट बदलून न देता या आस्थापनातून ते त्यांना दुरुस्त करून देण्यात आले. मात्र, या दुरुस्तीवर खुश नसलेल्या डायस यांनी पैसे परत मागितले असता, त्यांची मागणी धुडकावून लावण्यात आली. संतापलेल्या डायस यांनी उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर दावा केला होता. विरोधी पक्षकार असलेल्या हिल्स या आस्थापनाला मंचाने नोटीस पाठवूनही या आस्थापनाच्या वतीने कोणीही सुनावणीस हजर न राहिल्याने शेवटी त्यांच्या अनुपस्थितीत या दाव्यावर सुनावणी घेण्यात आली. अ‍ॅड. बाळे यांनी दिलेल्या निकालपत्रात, पहिल्याच दिवशी बूट तुटल्याने तो सदोष दर्जाचा होता हे सिद्ध होते. अशा वेळी बूट बदलून न देणे अथवा पैसे परत न करणे ही कृती म्हणजे सेवेतील कमतरता तर झालीच, त्याशिवाय बेजबाबदारपणा असल्याचे नमूद करून या महिलेला ज्या दिवशी हे बूट घेतले त्या दिवसापासून १७५0 रुपयांची रक्कम १२ टक्के व्याजाने फेडण्याबरोबरच झालेल्या मनस्तापाबद्दल १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई, तर दाव्याचा खर्च म्हणून अतिरिक्त पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला.