शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 21:46 IST

सरकारने कचरा व्यवस्थान खाते स्थापन केल्यानंतर या खात्याची बायंगिणीसाठी पहिली बैठक मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी घेतली.

पणजी : बायंगिणी येथे नवा 200 टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प होईलच, असे सरकारने गुरुवारी तिसवाडीतील पाच आमदारांची बैठक घेतल्यानंतर जाहीर केले. पाचही आमदारांनी बायंगिणीच्या नियोजित प्रकल्पाला पाठींबा दिला आहे. येत्या 28 रोजी जाहीर सुनावणी होणार असून त्यावेळी काही आमदार उपस्थित राहतील.

सरकारने कचरा व्यवस्थान खाते स्थापन केल्यानंतर या खात्याची बायंगिणीसाठी पहिली बैठक मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी घेतली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, पणजीचे बाबूश मोन्सेरात, सांताक्रुझचे टोनी फर्नाडिस, सांतआंद्रेचे फ्रान्सिस सिल्वेरा आदींनी बैठकीत भाग घेतला.बायंगिणीला प्रकल्प व्हायला हवा हा मुद्दा तिसवाडीतील सर्व आमदारांना पटला आहे. आम्ही जलदगतीने हा प्रकल्प उभा करू. जुनेगोवेचे काहीजण या प्रकल्पाला आक्षेप घेत होते, त्यांना कळंगुट-साळगावच्या पठारावरील प्रकल्प कसा चालतो ते नेऊन दाखविले गेले. त्यामुळे त्यांनाही विषय पटला, असे लोबो यांनी सांगितले. साळगावचा आधुनिक प्रकल्प हे आदर्श उदाहरण आहे, साळगावचा प्रकल्प यशस्वी ठरल्यानेच त्याची क्षमता 250 टनार्पयत वाढविली जाईल. प्रत्येकजण आज आपला कचरा साळगावच्या प्रकल्पात न्या असे सांगतो, असे लोबो म्हणाले.

मडकईकर व इतरांनी बायंगिणीच्या प्रकल्पाला आता पाठींबा दिला आहे. कारण तिसवाडीसाठी स्वतंत्र प्रकल्प हवाच. येत्या 28 रोजी होणा:या सार्वजनिक सुनावणीला आमदार उपस्थित राहून पाठींबा देऊ शकतात, असे लोबो यांनी स्पष्ट केले. पिसुर्ले- सत्तरी येथे वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला जाईल. दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा तिथे उपलब्ध आहे. वेर्णा येथेही एका प्रकल्पासाठी आयडीसी कचरा व्यवस्थापन खात्याकडे जागा सुपूर्द करील, असे लोबो यांनी सांगितले. स्वतंत्र खाते निर्माण झाल्यानंतर आता कचराप्रश्नी उपाय काढण्यासाठी रोज चर्चा होऊ लागली आहे असेही लोबो म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMLAआमदार