शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

पणजीत १७ नवे बायोमिथेनेशन मिनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:57 PM

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मिळणार असून २ कोटी रुपये महापालिका १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करणार आहे.

पणजी : गोव्याच्या या राजधानी पणजी शहरात कचरा विल्हेवाटीसाठी महापालिका १७ नवे बायोमिथेनेशन छोटेखानी प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण सर्व मिळून ५ टन क्षमतेचे हे प्रकल्प शहरात ठिकठिकाणी येणार आहेत. या प्रकल्पांवर एकूण ७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. महापौर उदय मडकईकर यांनी ही माहिती दिली. 

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मिळणार असून २ कोटी रुपये महापालिका १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करणार आहे. राजधानी शहरात सध्या रोज सुमारे ३0 टन ओला कचरा तयार होतो. हॉटेलांचा आणि घराघरांमध्ये किचनचा हा कचरा असतो. हॉटेले सध्या बंद असल्याने काही प्रमाणात ओला कचरा कमी झालेला आहे. ओला कचरा शहरात ठिकठिकाणी असलेल्या कंपोस्टिंग कें द्रात तसेच पाटो येथे एलआयसी मुख्यालयाजवळ असलेल्या प्रकल्पात जातो. १0 टन ओला कचरा रोज साळगांव येथील प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो, असे महापौरांनी सांगितले.

मळा येथे तळ्याजवळ, आल्तिनो येथे राखीव पोलीस दलाच्या परिसरात, कदंब बसस्थानकानजीक २, ट्रान्स्पोर्ट भवनजवळ, महापालिका गॅरेज परिसरात, सिने नॅशनल थिएटरजवळ, रोझ गार्डन परिसर, जॅक सिक्वेरा मार्गावर, कांपाल येथील सुलभ शौचालयानजीक, सांतइनेज येथे महापालिकेच्या अ‍ॅनिमल शेल्टरजवळ, पोलीस मुख्यालयाजवळ तसेच आल्तिनो येथे पॉलिटेक्निकनजीक व अन्यत्र हे प्रकल्प येतील. टोंक, करंझाळे येथे अशा प्रकारचे बायोमिथेनेशन प्रकल्प आहेत, अशी माहिती मडकईकर यांनी दिली.  सध्या टोंक, करंझाळे येथील बायोमिथेनेशन प्रकल्पातून निर्माण होणारा वायू हॉटेलांना स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरता येतो.असे येतील बायोमिथेनेशन कचरा प्रकल्पमळा, रुअ द औरें १५0 किलोमळा तलावाजवळ ७५ किलोसिने नॅशनल - १ ५00 किलोजीआरपी,आल्तिनो १५0 किलोमनपा गॅरेज आवार ३00 किलोसिने नॅशनल - २ ५00 किलोपोलीस मुख्यालय १५0 किलोपॉलिटेक्निक आल्तिनो १५0 किलोट्रान्स्पोर्ट भवनजवळ १000 किलोआंतरराज्य बसस्थानक  - १ ३00 किलोआंतरराज्य बसस्थानक -२ १५0 किलोआंतरराज्य बसस्थानक -३ ७५ किलोमळा तलावानजीक -३ ५00 किलोरोझ गार्डनजवळ ७५ किलोकरंझाळे जॅक सिक्वेरा मार्ग ५00 किलोसांतइनेज अ‍ॅनिमल शेल्टर ३00 किलोपरेड मैदान, कांपाल १५0 किलो

टॅग्स :goaगोवा