'अभंग रिपोस्ट'साठी १५० स्वयंसेवक सज्ज; मंत्री विश्वजीत राणेंनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:21 IST2026-03-27T14:20:55+5:302026-03-27T14:21:11+5:30

उसगाव येथे बैठक : सुरक्षा, वाहतूक व मूलभूत सुविधांच्या जबाबदाऱ्या निश्चित

150 volunteers ready for abhanga repost minister vishwajit rane takes review | 'अभंग रिपोस्ट'साठी १५० स्वयंसेवक सज्ज; मंत्री विश्वजीत राणेंनी घेतला आढावा

'अभंग रिपोस्ट'साठी १५० स्वयंसेवक सज्ज; मंत्री विश्वजीत राणेंनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: टाकवाडा-उसगाव येथे आयोजित 'अभंग रिपोस्ट' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उसगाव पंचायतीच्या जुन्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पातळीवर १५० स्वयंसेवकांची निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस मंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यालयातील प्रतिनिधी, उसगाव पंचायतीचे पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सरपंच राजेंद्र नाईक, जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक, पंच सदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, संजय (प्रकाश) गावडे, विनोद मास्कारेन्स, विलियम मास्कारेन्स, रेश्मा मटकर, तसेच माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

बैठकीत रामनाथ डांगी, अमेय कुलकर्णी आणि ओंकार मणेरकर यांनी कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा मांडली. स्वयंसेवकांसाठी पांढरा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला असून नियोजन सुलभ करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२८ रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व स्वयंसेवकांनी टाकवाडा-उसगाव मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २९ रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून स्वयंसेवकांना कार्यक्रम समाप्तीपर्यंत आपापली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये

कार्यक्रमादरम्यान सुरक्षेला १ प्राधान्य देत विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून बाउंसर आणि पोलिस तैनात केले जाणार आहेत.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात आले आहे. बैठकीनंतर कार्यक्रमस्थळी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाचे भूमिपूजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पूजा करून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रार्थना केली.

कार्यक्रमासाठी १५० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. सुरक्षा, वैद्यकीय सेवा, अग्निशमन सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र नियोजन करून मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणाऱ्या नागरिकांच्या सोयींवर भर दिला आहे.

 

Web Title : 'अभंग रीपोस्ट' के लिए 150 स्वयंसेवक तैयार; मंत्री राणे ने तैयारियों का जायजा लिया

Web Summary : उसगांव 'अभंग रीपोस्ट' के लिए 150 स्वयंसेवकों के साथ तैयार है। मंत्री राणे के कार्यालय ने सुरक्षा, चिकित्सा सहायता, अग्नि सेवाओं और जल आपूर्ति सुनिश्चित करते हुए तैयारियों की समीक्षा की। कार्यक्रम के लिए यातायात प्रबंधन की योजना बनाई गई है।

Web Title : 'Abhang Repost' Ready with 150 Volunteers; Minister Rane Reviews Preparations

Web Summary : Usgaon gears up for 'Abhang Repost' with 150 volunteers. Minister Rane's office reviewed preparations, ensuring safety, medical aid, fire services, and water supply. Traffic management is planned for the event.

टॅग्स :goaगोवा