शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींचे पर्यटन प्रकल्प मंजूर

By admin | Updated: May 30, 2014 02:22 IST

पणजी : कांपाल येथील युथ हॉस्टेलपासून रेईश मागूश किल्ल्यापर्यंत रोप-वे प्रकल्प राबविणे व सागरी विमान पर्यटनास चालना देणे, अशा प्रकारच्या प्रस्तावांना आता मूर्त स्वरूप येणार आहे.

पणजी : कांपाल येथील युथ हॉस्टेलपासून रेईश मागूश किल्ल्यापर्यंत रोप-वे प्रकल्प राबविणे व सागरी विमान पर्यटनास चालना देणे, अशा प्रकारच्या प्रस्तावांना आता मूर्त स्वरूप येणार आहे. सरकारच्या पर्यटनविषयक टास्क फोर्सच्या काल झालेल्या बैठकीत या प्रकल्पांसह एकूण १५० कोटी रुपये खर्चाचे विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी गुरुवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. गोव्याच्या पर्यटनाचा अधिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यास सरकार सज्ज झाले असून अनेक प्रस्ताव टास्क फोर्सने मंजूर केले आहेत. युथ हॉस्टेलपासून रेईश मागूश किल्ल्यापर्यंत म्हणजे १.४ किलोमीटर अंतरात रोप-वे प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतच्या कामाची निविदा जारी केली जाईल, असे मंत्री परुळेकर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फर्मागुडी येथे हॉटेल व्यवस्थापन संस्था उभी केली जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या संस्थेत गोमंतकीय मुलांना ५० टक्के जागा आरक्षित करून मिळाव्यात, असा प्रयत्न सरकार करणार आहे. कला अकादमीपासून सांता मोनिका जेटीपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्याच्या कडेने पणजीचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. एकूण ३० कोटींचा हा प्रकल्प आहे. तसेच नव्या पाटो पुलाकडे रोषणाई करून तिथेही विशेष सौंदर्यीकरण केले जाईल, असे परुळेकर यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रात विविध प्रकारच्या साधनसुविधा यापुढे वाढविल्या जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)