घरगुती सिलिंडरचा राज्यात १५ दिवसांचा साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:49 IST2026-03-12T09:48:55+5:302026-03-12T09:49:30+5:30

एजंट, पुरवठादारांची बैठक घेणार

15 days stock of domestic cylinders available in the state said cm pramod sawant | घरगुती सिलिंडरचा राज्यात १५ दिवसांचा साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची माहिती

घरगुती सिलिंडरचा राज्यात १५ दिवसांचा साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/नवी दिल्ली: राज्याकडे १५ दिवसांचा घरगुती गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शून्य तासावेळी दिली. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक राज्याकडे किती सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे, याची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार अहवाल मागविला आहे. याबाबत लवकरच एजंट, पुरवठादारांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले जातील, असे ते म्हणाले.

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी शून्य तासात एलपीजी सिलिंडरचा विषय मांडला होता. हॉटेल्स, रेस्टारंट्सना व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टारंट्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची विचारणा त्यांनी केली. दरम्यान, पयर्टन मंत्री रोहन खंवटे यांनी गॅस पुरवठा आणि वितरणासंदर्भातील अडचणी लक्षात घेता लवकरच भागधारकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

फक्त व्यावसायिक गॅस पुरवठ्याची अडचण

राज्यात घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'सध्या अडचण प्रामुख्याने व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबतच आहे, घरगुती सिलेंडर बाबत नव्हे. व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत राज्य सरकार पेट्रोलियम मंत्रालयाशी सतत संपर्कात असून लवकरच गॅसचा नियमित पुरवठा पुन्हा सुरू होईल. तसेच या परिस्थितीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राज्यात पुढील निर्णय घेतले जातील. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे,' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा : मोदी

पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे परंतु देशात इंधनाचा तुटवड्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अशा चुकीच्या माहितीला नागरिकांनी बळी पडू नये, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

इराणची ताकद संपली; युद्ध लवकरच थांबेल : ट्रम्प

अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इराणमध्ये लक्ष्य करण्यासारखे फारसे काही उरलेले नाही आणि हे युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तेल २०० डॉलरवर जाणार

कच्च्या तेलाच्या किमती २०० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जातील आणि शत्रू राष्ट्रांकडे जाणारे प्रत्येक जहाज आमचे लक्ष्य असेल, असा कठोर इशारा इराणच्या लष्करी कमांडने दिला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय शेअर बाजार घसरला. रुपया डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी कोसळून ९२.०१ वर बंद झाला.
 

Web Title : महाराष्ट्र में घरेलू गैस सिलेंडर का 15 दिनों का स्टॉक: मुख्यमंत्री

Web Summary : मुख्यमंत्री के अनुसार, महाराष्ट्र में 15 दिनों का घरेलू गैस सिलेंडर स्टॉक है। वाणिज्यिक आपूर्ति में समस्याएँ हैं, लेकिन सरकार पर्याप्त घरेलू एलपीजी का आश्वासन देती है और आपूर्ति बहाल करने के लिए पेट्रोलियम मंत्रालय के साथ समन्वय कर रही है।

Web Title : Maharashtra has 15-day domestic gas cylinder stock: Chief Minister

Web Summary : Maharashtra has a 15-day domestic gas cylinder stock, according to the Chief Minister. Commercial supply faces issues, but the government assures sufficient domestic LPG and is coordinating with the petroleum ministry to restore supply.