‘ल्युसोफोनिया’त १00 कोटींचा घोटाळा!
By Admin | Updated: July 20, 2014 01:40 IST2014-07-20T01:37:04+5:302014-07-20T01:40:53+5:30
पणजी : जानेवारी महिन्यात झालेल्या ल्युसोफोनिया स्पर्धेमध्ये ५0 ते १00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी

‘ल्युसोफोनिया’त १00 कोटींचा घोटाळा!
पणजी : जानेवारी महिन्यात झालेल्या ल्युसोफोनिया स्पर्धेमध्ये ५0 ते १00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. येत्या दोन ते तीन दिवसांत सीबीआयकडे तक्रार करून ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धांमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
ल्युसोफोनिया स्पर्धेदरम्यान भाडेतत्त्वावर मागविण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांवर एकूण ३ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले. क्रीडा स्पर्धा १८ ते २९ जानेवारी दरम्यान झाल्या होत्या. मात्र, १३ तारखेपासून चारचाकी गाड्या भाडेपट्टीवर घेण्यात आल्या. यात फॉर्च्युनर, आॅडी, कॅमरी, इनोव्हा इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. प्रतिनिधींसाठी व क्रीडापटूंची ने-आण करण्यासाठी लावण्यात आलेल्या एकूण १९0 गाड्या महाराष्ट्राच्या आहेत. गोव्यात इनोव्हा गाडी एका दिवसाच्या भाडेपट्टीवर पाच ते सहा हजार रुपयांत उपलब्ध होते, तर महाराष्ट्राहून अशाच इनोव्हा ११ हजार रुपये प्रति दिवसासाठी का आणण्यात आल्या, असा प्रश्न कामत यांनी केला.
ल्युसोफोनिया स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप सोहळ्यावर एकूण किती खर्च आला, असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारला असता उत्तर मिळू
शकले नाही. मात्र, यापूर्वी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नात यासाठी २२ कोटी ४२ लाख २0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे उत्तर मिळाले आहे. (पान २ वर)