वास्कोत १ लाखाची दहीहंडी; श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:22 IST2025-08-14T07:22:58+5:302025-08-14T07:22:58+5:30
यावर्षी समितीच्या आयोजनात होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेचे ५०वे वर्ष आहे.

वास्कोत १ लाखाची दहीहंडी; श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : शहरातील 'थ्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समिती'तर्फे शनिवारी (दि. १६) येथे ५०वी पारंपरिक दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा स्वतंत्रपथ मार्गावर आयोजित केली जाते. विजेत्या गटाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच हंडी फोडणाऱ्या 'गोपी' (गोविंदा) यासाठी खास बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती श्री ब्रदर्स दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष सुदेश कोलगावकर यांनी दिली.
यावेळी समितीचे सचिव दामोदर लोटलीकर, खजिनदार नारायण मेंडेगाळकर, उपाध्यक्ष स्पप्नेश मोरजकर तसेच सदस्य विवेक खोबरेकर, देवानंद आमोणकर, सुभाष राऊत आणि संकेत लोटलीकर उपस्थित होते.
यावर्षी समितीच्या आयोजनात होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेचे ५०वे वर्ष आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सायंकाळी ४:३० वाजता १० वर्षांखालील मुलांसाठी खास राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक बक्षिसे दिली जातील, असे कोलगावकर यांनी सांगितले.